माणिकरावांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा?

माणिकरावांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा?

  • Share this:

manikarao thakare on cm04 जुलै : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगलीमध्ये स्फोटक दावा केला की, राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री जयंत पाटील काँग्रेसमध्ये येऊ इच्छितात. पण त्यांचा हा दावा जयंतरावांनी ताबडतोब फेटाळून लावला. पण त्यामागचं कारण जरा वेगळंच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयवंत पाटील यांच्याबाबतच्या या वक्तव्याला माणिकराव आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातला तणाव कारणीभूत आहे. मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे आणि दिल्ली दरबारी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासाठीच माणिकरावांनी जयंत पाटलांबाबत गौप्यस्फोट केलाय.

 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीय. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. काँग्रेसलाही निवडणुकीचे वेध लागले आहे. राज्यात काँग्रेसमध्ये निवडणुकांसाठी सामोरं कोण जाणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. याच निमित्ताने आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेस नेत्यांकडून जयंत पाटलांवर जहरी टीका झाली. याला प्रतिउत्तर देताना पाटलांनी सोनिया गांधींवर टीका केली होती.

 

याच टीकेचा धागा पकडून माणिकरावांनी बुधवारी सांगलीत हा गौप्यस्फोट केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जेंव्हा-जेंव्हा मुंबईला येतात तेव्हा जयंत पाटील त्यांची भेट घेतात आणि मी कधी काँग्रेस पक्षात येऊ, मला कधी पक्षात घेणार अशी मागणी करतात असं माणिकराव ठाकरेंनी उघड केलं. मात्र, जयंत पाटलांनी माणिकरावांचा दावा फेटाळून लावलाय. त्यांचे आरोप अत्यंत खोटे आहे. असे खोटे आरोप करून आमच्या मतदारसंघात जनतेला संभ्रम अवस्थेत टाकण्याचा माणिकरावांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मी खासदार,आमदार, मंत्री असले किंवा कुणीही नसेल तरी माझी निष्ठा ही राष्ट्रवादीसोबत असणार आहे असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. पण काही लोकांना मी उगाच नाराज आहे असं वाटतं म्हणून ही धडपड करतात असा टोला ही लगावला.

Loading...

 

पण या सगळ्या प्रकरणातून माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांना कोंडीत पाडण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री आणि माणिकरावांमध्ये तणाव वाढला आहे. याची चर्चा दिल्लीमध्ये रंगली आहे. शरद पवारांनी जेंव्हा जयंत पाटलांना हातकणंगले मधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्यावर जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या दरम्यान जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळीक वाढली होती. याच संधी फायदा घेत माणिकरावांनी डाव टाकला.

 

आता  माणिकरावांच्या गौप्यस्फोटामुळे जयंत पाटलांची राष्ट्रवादीत कोंडी केलीय.राष्ट्रवादीचे नेते सुन्न झाले असून आता पाटलांकडे संशयाच्या नजरेनं पाहत आहे. तर मुख्यमंत्र्यांही अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींची मर्जी न विचारत घेता पाटलांसोबत जवळीक का साधली? असा संशय मुख्यमंत्र्यांवर घेतला जात आहे. एकंदरीतच माणिकरावांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

- मुख्यमंत्री आणि माणिकरावांमधला तणाव वाढला

- एकमेकांची कोंडी करण्याचा दोघांचाही प्रयत्न

- माणिकराव नको म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार

- दिल्ली दरबारी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासाठीच माणिकरावांचा जयंत पाटलांबाबत गौप्यस्फोट

- जयंत पाटलांवरील काँग्रेसच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सून्न

- मुख्यमंत्र्याबरोबरच्या जयंत पाटलांच्या सलगीची राष्ट्रवादीत चर्चा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2013 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...