'सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा'

'सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा'

  • Share this:

sinchan scam02 जुलै : सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवरून पुन्हा एकदा वातावरण तापलंय. एकिकडे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची शिफारस केलीय. त्यामुळे आघाडी सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंचनावरच्या खर्चाचा हिशेब जनतेसमोर मांडण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. पण ती विरोधकांनी मान्य केली नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये राज्यातल्या सिंचनावर 70 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. पण तरीही जलसंपदा मंत्री मात्र सर्व काही आलबेल असल्याचं सांगत आहेत. विरोधकांना न जुमानणार्‍या राज्य सरकारला मात्र मुंबई हायकोर्टानं फटकारलं. चितळे समितीमध्ये सरकारनियुक्त सदस्यांबरोबरच राज्यपालांनी सुद्धा आपले दोन सदस्य नेमावेत अशी शिफारस केली.

राज्यपालांनी चौकशीत हस्तक्षेप केला तर, चौकशीबरोबरच आघाडीच्या राजकारणाला सुद्धा वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विरोधक सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2013 08:22 PM IST

ताज्या बातम्या