श्रीनिवासन यांचा फैसला दोन दिवसात ?

श्रीनिवासन यांचा फैसला दोन दिवसात ?

मुंबई 31 मे : बीसीसीआयमध्ये अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याविरोधी गट सक्रिय झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांमध्ये श्रीनिवासन यांचं भवितव्य ठरेल. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही तर तातडीची बैठक बोलावण्यात येईल असं सांगण्यात येतंय. सध्याच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला आणि अरुण जेटली यांच्या अनौपचारिक चर्चेला सुरुवात केली. दुसरीकडे श्रीनिवासन यांना आणखी अडचणीत आणणारी घटना घडली. आयपीएलचे सीईओ सुंदर रामन यांनी गुरुनाथ मय्यप्पन, चेन्नई सुपर किंग्जचे मालक इंडिया सिमेंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली. तर मयप्पन याचा मित्र आणि हॉटेलचालक विक्रम अगरवाल याची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. अगरवाल हा विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांच्यातला दुवा समजला जातो.

  • Share this:

मुंबई 31 मे : बीसीसीआयमध्ये अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याविरोधी गट सक्रिय झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांमध्ये श्रीनिवासन यांचं भवितव्य ठरेल. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही तर तातडीची बैठक बोलावण्यात येईल असं सांगण्यात येतंय.

सध्याच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला आणि अरुण जेटली यांच्या अनौपचारिक चर्चेला सुरुवात केली. दुसरीकडे श्रीनिवासन यांना आणखी अडचणीत आणणारी घटना घडली. आयपीएलचे सीईओ सुंदर रामन यांनी गुरुनाथ मय्यप्पन, चेन्नई सुपर किंग्जचे मालक इंडिया सिमेंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली.

तर मयप्पन याचा मित्र आणि हॉटेलचालक विक्रम अगरवाल याची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. अगरवाल हा विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांच्यातला दुवा समजला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2013 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...