नक्षलवाद्यांची आबांना धमकी

नक्षलवाद्यांची आबांना धमकी

छत्तीसगड 30 मे : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्याला आठवडा होत नाही तोच पुन्हा एकदा नक्षवाद्यांनी वळवळ सुरू केली आहे. नक्षलवाद्यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना धमकी दिलीय. आपल्याला सरकारनं सुरक्षा पुरवली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं समजू नका असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. छत्तीसगडमधल्या काही न्यूज चॅनल्सना नक्षलवाद्यांनी हे पत्र दिलंय. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग आणि गृहमंत्री यांचीही नावं आहेत. नक्षलवाद्यांविरोधात केंद्र सरकारने सुरू केलेली ग्रीन हंट मोहीम तात्काळ थांबवावी असं आवाहनही या पत्रात करण्यात आलं आहे. तर, नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या फेरविचाराची गरज असल्याचं आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे.नक्षलवाद्यांचं पत्रक "आपल्याला पुरवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था आपलं संरक्षण करेल, या भ्रमात दंडकारण्य क्रांतीकारी आंदोलनाच्या विरोधात असलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, गृहमंत्री कन्वर तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील आहेत. झेड दर्जाची सुरक्षा असलेले महेंद्र कर्मासुद्धा याच भ्रमात होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधीसुद्धा याच भ्रमात होते. हा इतिहास जनतेनं घडवला आहे. काही दरोडेखोर आणि लांगूनचालन करणारे अधिकारी इतिहासाच्या कचर्‍यात फेकले जाणार आहेत. ऑपरेशन ग्रीनहंट तात्काळ बंद करा, दंडकारण्यात तैनात निमलष्करी दलाला मागे घ्या, वायूसेनेचा हस्तेक्षेप थांबवा, कारागृहात बंद असलेल्या कार्यकर्त्यांना मुक्त करा, निसर्गाशी खेळ करणार्‍या कार्पोरेट कंपन्यांबरोबर केलेले करार रद्द करा अशा आमच्या मागण्या आहेत." पुण्यात नक्षलवादी घातपात घडवण्याची शक्यतापुण्यातही नक्षलवादी सक्रीय आहेत आणि ते घातपात घडवण्याची शक्यता आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. अमेरिका दौर्‍यावरून परतल्यानंतर त्यांनी आज दिल्लीत छत्तीसगडमधल्या नक्षली हल्ल्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. नक्षली हल्ल्यावर राजकारण सुरू छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. पण, काँग्रेसनं या बैठकीवर बहिष्कार टाकला. बस्तरमध्ये हल्ला झाल्यानंतर नक्षलवादाशी लढण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि भाजप दोघांनीही दिली होती. पण, हल्ल्याला काही दिवस होत नाही तोच हेच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. दरम्यान, छत्तीसगडमधल्या नक्षली हल्ल्याप्रकरणी 124 नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात 60 महिला आणि 64 पुरुषांचा समावेश आहे.

  • Share this:

छत्तीसगड 30 मे : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्याला आठवडा होत नाही तोच पुन्हा एकदा नक्षवाद्यांनी वळवळ सुरू केली आहे. नक्षलवाद्यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना धमकी दिलीय. आपल्याला सरकारनं सुरक्षा पुरवली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं समजू नका असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

 

छत्तीसगडमधल्या काही न्यूज चॅनल्सना नक्षलवाद्यांनी हे पत्र दिलंय. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग आणि गृहमंत्री यांचीही नावं आहेत. नक्षलवाद्यांविरोधात केंद्र सरकारने सुरू केलेली ग्रीन हंट मोहीम तात्काळ थांबवावी असं आवाहनही या पत्रात करण्यात आलं आहे. तर, नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या फेरविचाराची गरज असल्याचं आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे.

 

नक्षलवाद्यांचं पत्रक

"आपल्याला पुरवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था आपलं संरक्षण करेल, या भ्रमात दंडकारण्य क्रांतीकारी आंदोलनाच्या विरोधात असलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, गृहमंत्री कन्वर तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील आहेत. झेड दर्जाची सुरक्षा असलेले महेंद्र कर्मासुद्धा याच भ्रमात होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधीसुद्धा याच भ्रमात होते. हा इतिहास जनतेनं घडवला आहे.

काही दरोडेखोर आणि लांगूनचालन करणारे अधिकारी इतिहासाच्या कचर्‍यात फेकले जाणार आहेत. ऑपरेशन ग्रीनहंट तात्काळ बंद करा, दंडकारण्यात तैनात निमलष्करी दलाला मागे घ्या, वायूसेनेचा हस्तेक्षेप थांबवा, कारागृहात बंद असलेल्या कार्यकर्त्यांना मुक्त करा, निसर्गाशी खेळ करणार्‍या कार्पोरेट कंपन्यांबरोबर केलेले करार रद्द करा अशा आमच्या मागण्या आहेत." पुण्यात नक्षलवादी घातपात घडवण्याची शक्यता

पुण्यातही नक्षलवादी सक्रीय आहेत आणि ते घातपात घडवण्याची शक्यता आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. अमेरिका दौर्‍यावरून परतल्यानंतर त्यांनी आज दिल्लीत छत्तीसगडमधल्या नक्षली हल्ल्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. नक्षली हल्ल्यावर राजकारण सुरू

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. पण, काँग्रेसनं या बैठकीवर बहिष्कार टाकला. बस्तरमध्ये हल्ला झाल्यानंतर नक्षलवादाशी लढण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि भाजप दोघांनीही दिली होती. पण, हल्ल्याला काही दिवस होत नाही तोच हेच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. दरम्यान, छत्तीसगडमधल्या नक्षली हल्ल्याप्रकरणी 124 नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात 60 महिला आणि 64 पुरुषांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2013 04:12 PM IST

ताज्या बातम्या