'आयबीएन-लोकमत'चे तिसर्‍या वर्षात पदार्पण

16 मार्चआज गुढीपाडवा...मराठी नववर्ष...हा सण नाविन्याचा...मांगल्याचा...याच मंगल प्रसंगी दोन वर्षांपूर्वी 'आयबीएन-लोकमत'ने मराठी टीव्ही चॅनलच्या विश्वात पाऊल ठेवले...बघता बघता दोन वर्ष पूर्ण झाली...आणि टीव्ही जर्नालिझमच्या विश्वात एका नव्या पर्वाची गुढी उभारली गेली. तिथीप्रमाणे 'आयबीएन-लोकमत'ला आज दोन वर्षे पूर्ण झाली... या कालावधीत टीव्ही जर्नालिझममध्ये 'आयबीएन-लोकमत'ने इतिहास घडवला...बातम्या तर सर्वच जण देतात... आम्ही चाकोरीबध्द बातम्या देण्याऐवजी वेगळ्या धाटणीच्या बातम्या देण्याचे पथ्य पाळले...बातमीच्या मुळाशी गेलो आणि सतत आमच्या दर्शकांना खरी बातमी दिली...त्यातील काही बातम्या ठरल्या सर्वप्रथम... काही बातम्यांनी इतिहास घडवला...'आयबीएन-लोकमत'वरील बातम्यांचा इम्पॅक्ट झाला... दोन वर्षांच्या काळात आम्ही अनेक कॅम्पेन राबवली...जिथे समस्या होत्या...लोकांवर अन्याय सुरू होता त्या-त्या ठिकाणी आम्ही धडक पोहोचलो... रेल्वे सुरक्षेचा प्रश्न असो की, शिक्षणाचा खेळखंडोबा...आमच्या या अभियानात सर्वसामान्य सहभागी झाले....आणि सुरू केली सिटीझन जर्नालिस्टची चळवळ...त्यामुळे लोकही निर्भिडपणे बोलू लागले...सर्वोत्तम देणे, बातमीतले सत्य सांगणे हा आम्ही आमचा धर्म मानला...त्यामुळे आमची प्रत्येक बातमी सर्वोत्कृष्ट ठरली...मग ते खेळाचे मैदान असो किंवा राजकारणाचा आखाडा...26 नोव्हेंबरसारख्या घटनांचा थरारही आम्ही टिपला आणि हे सारे करताना सामाजिक भानही जपले... निवडणुका लोकसभेच्या असोत की विधानसभेच्या.....अचूक आणि विश्वासार्ह विश्लेषणच आम्ही लोकापर्यंत पोहोचवले. केवळ विश्लेषणच नाही, तर लोकांना नेमक्या काय अपेक्षा आहेत, थेट तेही जाणून घेतले, जनतेचा जाहीरनामासारख्या कार्यक्रमातून....महाराष्ट्राचा महासंग्रामातून राजकारण्यांची सुंदोपसुंदीही दाखवली....त्याचवेळी आमच्या सुपरमॅनने सामान्यांची परिस्थिती मांडली ती आश्वासनांची खैरात करणार्‍या राजकारण्यांना चिमटे काढत.... लोकांना नेमके काय हवे ते टिपले...सणांची मजा...मग ते पारंपरिक सण असो किंवा राष्ट्रीय प्रत्येक क्षणाची मजा 'आयबीएन-लोकमत'च्या दर्शकांच्या आयुष्यात आणून नवे रंग भरण्याचा प्रयत्न आवर्जून केला...मराठी माणसाला प्रथमच बिझनेसच्या रडारावर आणलं...आजचा सवाल...ग्रेट भेट, रिपोर्ताज आणि तरूणाईचे अंतरंग टिपणा-या युथट्युब, टेक गुरूसारख्या कार्यक्रमांची मेजवानीही सोबत आणली... राकट, कणखर आणि निसर्गाचे मनोहारी लेणे लाभलेल्या महाराष्ट्राची सफरही घडवली डिस्कव्हर महाराष्ट्रमधून... लोकांची बातम्यांची भूक आम्ही भागवली..लोकांचा खरा साथी...त्यांच्या सुख...दुःखातील सोबती असा लौकिक म्हणूनच निर्माण झाला....आणि लोकांचे प्रश्न मांडत असतानाच पूर्वग्रहदूषित वृत्तीने केलेला हल्लाही 'आयबीएन-लोकमत'ने खंबीरपणे झेलला... पण धमकी , हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाही, सत्य तेच मांडत राहू...हे आमचे ब्रीद, वचन म्हणूनच दर्शकांसमोर सतत येत राहील...

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 11, 2013 01:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2010 10:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...