ग्रामपंचायतीच्या सर्वात श्रीमंत उमेदवार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2014 07:59 PM IST

ग्रामपंचायतीच्या सर्वात श्रीमंत उमेदवार

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये श्रीमंत उमेदवाराचा नवा इतिहास घडलाय. खारघर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लीना अर्जुन गरड या उमेदवारानं आपली मालमत्ता एक ..दोन..पाच नव्हे तर तब्बल दोनशे कोटी इतकी दाखवलीय. त्या आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्यात. लीना गरड यांचे पती पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कुठून याची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलीय. गरड यांच्या पतींची गेल्या 17 वर्षांमध्ये बदली झालेली नाही. त्याचीही चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केलीये.

सौ. लिना अर्जून गरड खारघर ग्रामपंचायत निवडणूकीच्या खारघर कॉलनी फोरमच्या उमेदवार... पती पोलिस अधिकारी ... लिना गरड या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्यात. गरड यांनी निवडणूक आयोगाला तब्बल दोनशे कोटी रुपयांची मालमत्ता सादर केलीय.

Loading...

काय आहे मालमत्ता एक नजर टाकू या

  • 17 चारचाकी वाहनं
  • ज्यात नऊ ट्रक,
  • मारुती व्हॅन, होंन्डा सिटी, फॉर्च्युनर ,स्कार्पियो गाड्यांचा समावेश
  • सर्व गाडयांचा नंबर वन झिरो झिरो ( 100)
  • उल्वेत 27 प्लाट - जमिनिचे पट्टे
  • खारघर आणि नाव्हे मध्ये जमिनिचे पट्टे
  • खारघर मध्ये सहा प्लॅट
  • खारघर मध्ये तीन दुकानं
  • 14 लाखांचे सोन्याचे दागिने
  • एक कोटी 65 लाखांचे दागिने

एखादा उमेदवार शि्रमंत असण्यास आक्षेप नाही. पण ही प्रापर्टी मुळ स्त्रोत काय? गरड यांपुर्वी काही व्यवसाय करत होत्या का? लिना गरड यांचे पती अर्जुन गरड यांची सतरा वर्षात नवी मुंबबईतुन बदली का झाली नाही? असा आरोप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय.

विधानसभा वा लोकसभा निवडणूका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत एका ग्रामपंचायत सदस्यानं तब्बल दोनशे कोटीची मालमत्ता जाहिर केल्यानं निवडणूक सर्वसामान्यांची राहिलीय का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2014 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...