News18 Lokmat

संभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी

संभाजी भिडे यांच्या पाठीशी कोण आहे आणि त्यांचा मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेला कळलं पाहिजे असं म्हणत संभाजी भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 06:45 PM IST

संभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी

नागपूर,ता.9 जुलै : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आज टीकेची झोड उठवली. संभाजी भिडे यांच्या पाठीशी कोण आहे आणि त्यांचा मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेला कळलं पाहिजे असं म्हणत संभाजी भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. तर भिडेंच्या वक्तव्यात काही चुकीचं आढळलं तर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सार्वजनीक ठिकाणी जाण्यावर बंदी घातलेली असतांनासुद्धा त्यांनी पुण्यात दाखल होवून तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेतले होते.

VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी

मालाड ते बागपत जेल असा होता मुन्ना बजरंगीचा प्रवास

एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांना देखील कमी लेखतात. हे कसं काय चालवून घेतलं जातं? अशी टीका करत, अजितदादा पवार यांनी संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर, सरकार अशा लोकांना का पाठीशी घालत आहे? बंदी घातलेली असतांना पोलीसांनी त्यांना त्या ठिकाणी का येऊ दिलं?

VIDEO : तुळशी तलाव ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

Loading...

ब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं?

असे सवाल टीकेची झोड उमटवितांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अशा प्रकारच्या प्रवृत्ती राज्याकरीता हानीकारक असून, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त लावण्यासाठी आपली इच्छाशक्ती आहे का? असा टोलाही यावेळी विखे पाटलांनी लगावला.  या सर्व टीकेला उत्तर देतांना, तपासाअंती भिडे गुरुजींच्या वक्तव्यात काही असंवैधानिक आणि बेकायदेशीर आढळल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई करु असे आश्वास्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...