देशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या

देशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या

सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे.

  • Share this:

पुरंदर, 06 ऑगस्ट : सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे. नुवान विषारी औषध पिऊन या युवकाने कडेपठारावरून उडी टाकली आणि आत्महत्या केली आहे. जेजुरी कडेपठार मंदिर डोंगराच्या पायथ्याला झाडीत या युवकाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संपूर्ण जेजूरीत खळबळ उडाली आहे. युवकाचं वय अंदाजे 23 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे.

चेतन महेश रणदिवे असं या आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. तो पुरंदर येथील रहिवाशी आहे. चेतन हा 2015 पासून भारतीय सैन्यात असून तो श्रीनगर येथे सद्या कार्यरत होता.   तो सुट्टीवर धालेवाडी येथे आला होता. सुट्टी संपल्याने  तो श्रीनगरला कालच जाणार होता. जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते. बरोबर लागणारे सामानसुमान बांधून ठेवले होते.

मात्र काल तो मित्राकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. आवराआवरी  करून ही तो रात्री उशीरा घरी आला नसल्याने घरचे सर्वजण चिंतेत होते. जेजुरी पोलीस ठाण्यात ही तशी तक्रार देण्यात आली होती. आज मात्र सकाळीच कडेपठार डोंगरात त्याचा मृतदेह आढळून आला.

खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना कडेपठार चढत्यावेळी झाडात एक मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच याची खबर पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चेतन मृतदेह झाडीतून बाहेर काढण्यात आला. त्याची तपासणी करता त्याची ओळख पोलिसांना पटली. त्यानंतर चेतनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींची जवाब नोंदवून घेतला आहे. चेतन हा सैन्यात होता त्यामुळे नक्की त्याने आत्महत्या का केली याचा पोलीस आता वेगळ्या बाजूने तपास करत आहेत. पण अद्याप चेतनच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पण चेतनच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 10:21 AM IST

ताज्या बातम्या