'...अमर रहे', शहीद सावन माने अनंतात विलीन

'...अमर रहे', शहीद सावन माने अनंतात विलीन

आज गोगवे गावातील गोकुळ दूध संघाच्या पटांगणासमोर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • Share this:

24 जून : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना कोल्हापूरचा सुपूत्र सावन माने यांना वीरमरण आलं. आज मुळगावी शोकाकूल वातवरणात सावन माने यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या गावाच्या या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

जम्मूमध्ये पुँछ भागात पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीमने केलेल्या गोळीबारामधे महाराष्ट्रचे 2 जवान शहीद झालेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सावन बाळकु माने यांना ही वीरमरण आलं.

दोन दिवसानंतर आज सकाळी त्यांचं पार्थिव पुण्यातून हेलिकॉप्टरनं कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं. कोल्हापूरमध्ये टीए बटालियनच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील गोगवे गावी हे पार्थिव आणण्यात आलं.

गेल्या 2 दिवसांपासून ग्रामस्थ हे पार्थिवाची वाट पाहत होते.  आज गोगवे गावातील गोकुळ दूध संघाच्या पटांगणासमोर त्यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या 25 व्या वर्षी गोगवे गावाच्या या विरपूत्राला भारत माता की जय घोषणा देत साश्रू नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2017 01:32 PM IST

ताज्या बातम्या