अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द! औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द! औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

अर्जुन खोतकर यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज उशिरा दाखल केल्याचा ठपका हायकोर्टाने ठेवला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 24 नोव्हेंबर: राज्याचे वस्त्रोद्योग,पशुसंवर्धन,दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.अर्जुन खोतकर यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज उशिरा दाखल केल्याचा ठपका हायकोर्टाने ठेवला आहे.

याप्रकरणी खोतकरांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर  सुनावणी करताना हायकोर्टाने शुक्रवारी खोतकर यांची आमदारकी रद्द केली. दरम्यान, कोर्टाने खोतकर यांना सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.

 

काय आहे प्रकरण? 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत अर्जुन खोतकर यांचा अवघ्या 296 मतांनी विजय झाला होता. त्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार  खोतकर यांनी नियोजित वेळेहून उशिरा उमेदवारी अर्ज दाखल केला  असं म्हटलं आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अर्जुन खोतकर यांच्या विरोधात निकाल देत त्यांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे खोतकर यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रिपद रद्द होणार आहे.

2014 विधानसभा निकालाची आकडेवारी 

पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते

अर्जुन खोतकर-शिवसेना-45,078

कैलास गोर्ंट्याल-काँग्रेस-44,782

विजयी मतांचा फरक 296

कोण आहेत खोतकर?

-अर्जुन खोतकर हे जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहे.

- सध्याच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री आहेत.

- खोतकरांकडे वस्त्रोद्योग,पशुसंवर्धन,दुग्धविकास आणि मत्स्यविकास  मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

- खोतकर हे चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

- 1999 मधील शिवसेनेच्या सरकारमध्येही खोतकर यांना राज्यमंत्रिदाची जबाबदारी देण्यात आलेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 12:39 PM IST

ताज्या बातम्या