दहावी परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिली चक्क आर्ची आणि परश्याची लव्हस्टोरी!

यंदाही एका विद्यार्थ्याने चक्क सैराट चित्रपटातल्या आर्ची-परश्याची अख्खी लव्हस्टोरीच उत्तरपत्रिकेत लिहून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. परिणामी तो विद्यार्थी शिक्षेस पात्र झाला असून परीक्षेत नापास झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 05:49 PM IST

दहावी परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिली चक्क आर्ची आणि परश्याची लव्हस्टोरी!

नितीन बनसोडे (प्रतिनिधी)

लातूर, 11 जून- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा (SSC)निकाल नुकताच जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार आणि कॉपी करण्याचे प्रमाण कमी झालं असलं तरी अभ्यास न झालेले काही विद्यार्थी आता कॉपी न करता उत्तरपत्रिकेत असंदर्भीय लिखाण करू लागल्याचे समोर आले आहे. दरवर्षी अशा दुर्मीळ पण मजेशीर घटना  समोर येतात. यंदाही एका विद्यार्थ्याने चक्क सैराट चित्रपटातल्या आर्ची-परश्याची अख्खी लव्हस्टोरीच उत्तरपत्रिकेत लिहून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. परिणामी तो विद्यार्थी शिक्षेस पात्र झाला असून परीक्षेत नापास झाला आहे.

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत असंदर्भीय काही लिहिले असेल तर संबंधित शिक्षकांना ती उत्तरपत्रिका नियामकाकडे द्यावी लागते. त्यांच्याकडून बोर्डाच्या चौकशी समितीकडे सदर प्रकरण येते. त्यानुसार समितीने उत्तरपत्रिकेची पडताळणी केली जाते. अशीच एक उत्तरपत्रिका बोर्डाकडे आली होती. संबंधित विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत एकाही प्रश्नाचे उत्तर लिहिले नव्हते, जे काही लिहिले ते 'सैराट'च आहे. तसेच एका परीक्षार्थ्याने तर उत्तरपत्रिकेत संपर्क करण्यासाठी स्वत:चा मोबाइल नंबर लिहिला आहे.

दरम्यान, असाच एक प्रकार गतवर्षी देखील समोर आला होता. एकाने अख्खी उत्तरपत्रिका 'जय श्रीराम जय श्रीराम' लिहून संपविली होती. मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेवर मोबाइल क्रमांक लिहून संपर्क करण्याचा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, पेपर तपासणी करणाऱ्यास धमकावणे, उत्तीर्ण करण्यासाठी विनवणी करणे, असे काही लिहिल्यास एक अथवा दोन परीक्षांसाठी अपात्र ठरविण्यात येते. परंतु, सैराट कथा लिहिणाऱ्या विद्यार्थ्याने उत्तीर्ण होण्यासाठी संपर्क अथवा धमकी, विनवणी असे काहीही केले नाही, त्यामुळे त्याला 'त्या' एका विषयापुरतेच त्या विध्यार्थ्याला नापास करण्यात आले आहे. दरम्यान, त्या विद्यार्थ्याला इतर पेपरमध्ये किती गुण मिळाले, हे समजू शकले नाही!

10 वीच्या स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार..

Loading...

यंदा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा 10 वी निकाल कमी लागला त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली. यावर्षीच्या निकालात शाळांनी दिलेले अंतर्गत गुण ग्राह्य धरले नसल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलं. या निकालामुळे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी मागे पडतील अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती. ही चिंता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी बोलणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केलं.

अकारावीच्या प्रवेशासाठी CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परिक्षेचेच गुण ग्राह्य धरले जावेत यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचंही तावडे यांनी जाहीर केलं. एकूण निकाल लावताना CBSE आणि ICSEच्या मुलांचे शाळांनी अंतर्गत परिक्षेत दिलेले काही गुण ग्राह्य धरले जातात. स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा नाही. त्यामुळे त्यांच्या निकालाची टक्केवारी एकदम खाली घसरली.

अंतर्गत गुणांमुळे निकालाची टक्केवारी वाढते. शाळा आपल्या मुलांना गुण देताना सढळ हाताने गुणे देतात त्यामुळे निकालांची टक्केवारी वाढते. हे गुण देतांना योग्य निकष लावले जात नाही असं आढळून आल्याने राज्य सरकारने ते गुण ग्राह्य धरणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र CBSE आणि ICSEच्या मुलांना मात्र हे गुण दिले जातात. त्यांचं बोर्ड वेगळं असल्याने त्यांना हा नियम लागू होत नाही. या निर्णयचा फटका बसल्याने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

निकालांच्या तीव्र स्पर्धेत स्टेट बोर्डाची मुलं मागे पडतील अशी चिंता सर्वच स्तरांमधून व्यक्त होत होती. पालक आणि विद्यार्थ्यांनीही तीव्र चिंता व्यक्त केली होती त्या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची विनंती केंद्राने मान्य केली तर 10वीच्या लाखो विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशासाठी मोठा फायदा मिळणार आहे.


गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...