S M L

मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कुणालाही पडू शकतात-अशोक चव्हाणांचा अजित पवारांना टोला

काल राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नेतृत्त्व अजित पवारांकडेच असणार हे खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अनेक चर्चांना सुरूवात झाली होती. वेगवेगळ्या पक्षातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 12, 2018 06:59 PM IST

मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कुणालाही पडू शकतात-अशोक चव्हाणांचा अजित पवारांना टोला

12 एप्रिल:  अजित पवारांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसनं हात झटकले आहेत.  अजित पवारांनी नेतृत्व करावं की नाही  हा  राष्ट्रवादीचा  पक्षांतर्गत विषय  असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कुणालाही पडू शकतात असा सुचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नेतृत्त्व अजित पवारांकडेच असणार हे खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अनेक चर्चांना सुरूवात झाली होती. वेगवेगळ्या पक्षातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या  आहेत.  अजित पवार मुख्यमंत्री होतात की काय अशी चर्चाही रंगायला लागली होती . यावर काँग्रेसच काय मत  आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. त्यावर आपली भूमिका अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केली.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेत त्यावर  अधिक भाष्य करणं टाळलं. हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत मामला असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच निवडणूक होण्याआधी असं काही बोलणं मला योग्य वाटत नाही अशी सुचक टिप्पणीही त्यांनी केली.

आता या सगळ्यात महाराष्ट्राचं राजकारण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 06:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close