S M L

आपण 52 सेकंद राष्ट्रगीतासाठी उभं राहू शकत नाही?-अनुपम खेर

यावेळी आयुष्यातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तसंच त्यांच्या वडिलांच्या आठवणीही जागवल्या

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 30, 2017 10:34 AM IST

आपण 52 सेकंद राष्ट्रगीतासाठी उभं राहू शकत नाही?-अनुपम खेर

पुणे, 30 ऑक्टोबर: आपण राष्ट्रगीतासाठा 52 सेकंद उभे राहू शकत नाही का असा प्रश्न अनुपम खेर यांनी उपस्थित केला आहे.ते काल प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

पुण्यात काल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे नवनियुक्त अध्यक्ष ,ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रमोद महाजन स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आलं. ट्रीपल तलाक विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या शायरा बानो यांनाही सन्मानित करण्यात आला.या कार्यकक्रमाला पुनम महाजन याही उपस्थित होत्या.मी वडिलांच्या नावाचा कधीच वापर करून घेतला नाही. 11 वर्ष राजकारणात आहे असं म्हणत पुनम महाजन यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं. तसंच यावेळी अनुपम खेर यांनी काही मार्मिक प्रश्न उपस्थित केले. ' आज राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं का नाही यासाठी पण वाद होतात. आपण ५२ सेकंद राष्ट्रगीतासाठी उभे राहू शकत नाही का' असा सवाल ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विचारला. यावेळी आयुष्यातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तसंच त्यांच्या वडिलांच्या आठवणीही जागवल्या. त्यांनी केलेल्या फटकेबाजीने प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 10:18 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close