News18 Lokmat

नाशिकमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या दिवसातली ही तिसरी घटना आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2018 10:43 AM IST

नाशिकमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

बब्बू शेख, प्रतिनिधी


नाशिक, 22 नोव्हेंबर : मुंबईत जवळपास २० हजार शेतकरी न्याय हक्कासाठी मोर्चा काढला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे.Loading...

नाशिकमध्ये आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बागलाणच्या खामलोण येथील रामदास धोंडगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून धोंडगे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.


नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या दिवसातली ही तिसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच नांदगांव तालुक्यातील पळाशी येथे एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.


दरम्यान, मुंबईत शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा  मुंबईत पोहोचला आहे. हजारो कष्टकऱ्यांचा हा मोर्चा आझाद मैदानावर दाखल होईल. आझाद मैदानावर मोर्चा पोहोचल्यानंतर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ न्यायाधीश बी.जे कोळसे पाटील असतील. यानंतर मुंबई विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे.


==================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 10:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...