S M L

राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2018 11:34 PM IST

राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

पुणे, 13 जून : राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी आज आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीये. याआधी तीन आरोपींना तीन आरोपींना अटक करण्यात आलीये.

एक जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. दंगलीत राहुल फटांगडे याचा मृत्यू झाला होता. राहुलच्या मृत्यू प्रकरणात या आधी तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती. तरी देखील उर्वरित चार आरोपींचा तपास सुरू असल्याचंही पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.

आता याच प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. पुणे पोलिसांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णीतून सुरज शिंदेंला  ताब्यात घेतलं. आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 11:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close