S M L

लोकसभा 2019: नितीन गडकरींच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला.

Updated On: Mar 26, 2019 08:49 AM IST

लोकसभा 2019: नितीन गडकरींच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ!

नागपूर, 26 मार्च: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. गेल्या 5 वर्षात गडकरी यांच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गडकरींनी सादर केलेल्या माहितीनुसार 2017-18 मध्ये त्यांची उत्पन्न 6.4 लाख इतके होते. तर 5 वर्षापूर्वी 2013-14मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.7 लाख इतके होते. 2014-15 या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नात 6 लाखांनी वाढ झाली. त्यानंतर त्यांचे उत्पन्न मात्र स्थिर आहे.

गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या उत्पन्नात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 4.6 लाख होते. त्यात 2017-18मध्ये वाढ होत ते 40 लाखावर पोहोचले आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना गेल्या पाच वर्षातील आय टी रिटर्न्समधील उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे.

एकूण संपत्ती 7 कोटी


गडकरींची एकूण संपत्ती 6.9 कोटी रुपये अतकी आहे. यातील 1.96 कोटी संपत्ती वडीलांकडून मिळालेली आहे. 2014च्या तुलनेत या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वडीलांकडून मिळालेल्या संपत्तीचे मुल्य वाढल्याने ही वाढ झाली आहे.

पत्नीची संपत्ती 127 टक्क्यांनी वाढली

गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्याकडे 7.3 कोटी इतकी संपत्ती आहे. 2014च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 127 टक्के वाढ झाली आहे. गडकरी यांच्याकडे वरळी येथे एक फ्लॅट आहे. या घराची किमत 2014मध्ये 3.78 कोटी इतकी होती ती आता 12.5 टक्क्यांनी वाढून 4.25 कोटी झाली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे 22 लाखांचे दागिने आहेत.

Loading...

बँकतील पैसा कमी झाला

2014च्या तुलनेत गडकरी यांच्या बँकेतील ठेवी कमी झाल्या आहेत. बँकेत त्यांनी 9 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2014च्या तुलनेत ही रक्कम 57 टक्क्यांनी कमी आहे. निवडणुकीचा खर्च करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र बँक खाते सुरु केले असून त्यात 1 लाख रुपये आहेत. शेअर बाजारातील त्यांची गुंतवणूक 78 टक्क्यांनी कमी झाली आहे. गडकरींकडे केवळ 3 गाड्या असून त्यापैकी एक अॅबेसिडर असून त्याची किमत 10 हजार इतकी सांगण्यात आली आहे. तर 20 लाखाची एक होडा देखील आहे.

कर्ज वाढले

गडकरींवर 2014मध्ये 1.3 कोटी इतके कर्ज होते. त्यात वाढ होते ते 1.57 कोटी इतके झाले आहे. याशिवाय त्यांच्यावर 3 गुन्हे देखील आहेत.


लिंबू सरबत पिण्याआधी 'हा' VIDEO एकदा पाहाच


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2019 08:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close