Elec-widget

गिरीश महाजन येऊन काही होणार नाही : अण्णा हजारे

गिरीश महाजन येऊन काही होणार नाही : अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण सुरू, गिरीश महाजनांची भेट नाकारली.

  • Share this:

राळेगणसिद्धी, 30 जानेवारी: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून पुन्हा केंद्र सरकारविरोधात उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांची भेट घेण्यासाठी येणार होते. मात्र गिरीश महाजन यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द करण्यात आला आहे.

गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांची याआधीही भेट घेतली आहे. आता अण्णा हजारेंनी गिरीश महाजन यांच्या हातात काही नसल्याचे सांगत भेट देण्यास नकार दिला आहे. लोकपाल कायद्याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे आणि कायदा होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे अण्णा हजारेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी अण्णांनी उपोषणाला बसू नये असं वाटतं. त्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्यावरही ते तयार न झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच अण्णांशी चर्चा सुरू असून एक-दोन दिवसात त्यांचं समाधान करू. अण्णा उपोषण मागे घेतील असंही गिरीश महाजन म्हणाले.

मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत चौकशी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त मंजुरीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले आहे. परंतु, सरकारने हा निर्णय जरी घेतला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी नवी अट घातली आहे.

अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. सरकारने लोकपाल आणि लोकायुक्त त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बाबत वारंवार आश्वसानं दिलं होतं. पण अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेटही घेतली होती.

Loading...


अशी होणार लोकायुक्त / उपलोकायुक्तांची निवड


5 जणांची समिती असणार


अध्यक्ष - 1) मुख्यमंत्री


सदस्य - 2) विधानसभा अध्यक्ष


3) विधानसभेतील विरोधी पक्ष नेते


4) हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती


5) राज्यपालांनी नेमलेले ज्येष्ठ विधिज्ञ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...