News18 Lokmat

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये

अण्णा हजारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 02:04 PM IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये

अहमदनगर, 14 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा आल्यानं त्यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. 30 जानेवारीपासून अण्णा हजारेंनी सात दिवस सरकारविरोधात लोकपालसह विविध मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. त्यामुळं त्यांचं वजनही घटले होते. आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

जास्त अशक्तपणा आल्यामुळे त्यांना अहमदनगरच्या नोबेल हॉस्पिटल मध्ये उपचार आणि तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपोषणाच्या काळात जास्तच अशक्तपणा आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...