अंनिसच्या 'होळी लहान, पोळी दान' उपक्रमाला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद

बहुतांश मुंबईकरांनी पोळ्यांचा नैवेद्य होळीमध्ये न जाळता, त्यांचे गरिबांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 01:48 PM IST

अंनिसच्या 'होळी लहान, पोळी दान' उपक्रमाला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद

मुंबई, 21 मार्च : 'महाराष्ट्र अंनिस'ने बुधवारी (20 मार्च)मुंबईत राबवलेल्या 'होळी लहान, पोळी दान' उपक्रमाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी ग्रँट रोड ते विरारपर्यंत सोसायटीतून स्वतःहून फोन करून नागरिकांनी होळीचा नैवेद्य म्हणून जाळल्या जाणाऱ्या पोळ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिल्या. दहिसरमधील काही सोसायटीतील नागरिकांनी नैवेद्यासाठी स्वतंत्र भांडे ठेवून त्याला 'नैवेद्य कुंड' असे नाव दिलं होतं.  मीरा रोडच्या 'सुंदर दर्शन' सोसायटीमध्ये एकसुद्धा पोळी होळीत टाकली गेली नाही, याऐवजी सर्व पोळ्या गोळा करून त्यांनी कार्यकर्त्यांना पोहोचवल्या, अशी माहिती दहिसरचा कार्यकर्ता हरिश खूप अभिमान आणि समाधानाने सांगत होता.

या उपक्रमासाठी संदेश पाटील आणि अविनाश सूर्यवंशी यांनी प्रचंड मेहनत घेऊन तिथल्या स्थानिकांचं प्रबोधन केले. दादर परिसरात योद्धा मित्र मंडळ, आभा परिवर्तनवादी संघटना आणि अंनिसच्या कार्यकत्यांनी पोळ्या गोळा करून फुल मार्केट आणि टाटा हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये वाटल्या.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते पोळ्यांचं वाटप करत होते. पोळ्या घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कार्यकर्ते हेलावून गेले होते. या उपक्रमांतर्गत जवळपास एक हजारपेक्षा अधिक पोळ्या होळीमध्ये जाण्यापासून वाचवून त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना झाला आहे.

SPECIAL REPORT: सांगली कुणासाठी चांगली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: holi
First Published: Mar 21, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...