Elec-widget

हिवरा आश्रमात साहित्य संमेलनाच्या आयोजनाला अंनिसचा विरोध

हिवरा आश्रमात साहित्य संमेलनाच्या आयोजनाला अंनिसचा विरोध

हे आश्रम चालवणारे शुखदास महाराज यांचा अ.भा.अंनिसचे श्याम मानव यांनी दोन वेळा भांडाफोड केला होता.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, 10 सप्टेंबर : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे घेण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा विरोध आहे. हे आश्रम चालवणारे शुखदास महाराज यांचा अ.भा.अंनिसचे श्याम मानव यांनी दोन वेळा भांडाफोड केला होता.

शुखदास महाराज हे महिला भक्तांना आपल्या शरीरात कृष्ण वास करत असल्याच सांगून महिलांच्या व्याधींवर उपचार करून शोषण करायचे असे मानव यांनी उघड केलं होतं. श्याम मानव यांच्या   १) कृष्णेचा सोंग घेणारा राधेचा शुखदास २) बुवाबाजी शोषण महिलांचे या पुस्तकांत शुखदास महारांजाच्या बुवाबाजी संदर्भात उल्लेख आहे.

बुलढाण्यात संमेलन घेण्यास आमची हरकत नाही, जिजाऊच्या गावी साहित्य संमेलन घेतल्यास सर्वांना आनंदच आहे.  पण शुखदास महाराजांच्या आश्रमात संमेलन का ? असा सवाल अ.भा. अंनिसनं विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...