नरभक्षक वाघिणीला वाचवण्यासाठी व्याघ्रप्रेमींची सुप्रीम कोर्टात धाव

नरभक्षक वाघिणीला वाचवण्यासाठी व्याघ्रप्रेमींची सुप्रीम कोर्टात धाव

याविरूद्ध डाँ जेरिल बानाईत यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती.वाघिण तरूण असल्यामुळे ती प्रजोत्पादन करू शकते. तिला ठार मारलं तर तिची पिढीच नष्ट होईल त्यामुळे तिला ठार मारणं हानीकारक आहे अशी त्यांची भूमीका होती.

  • Share this:

नागपूर,12 ऑक्टोबर:नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात नागरिक आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचे वनविभागाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता वाघिणीचे प्राण वाचवण्यासाठी व्याघ्रप्रेमींनी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.

ब्रम्हपुरी अरण्यातील या नरभक्षक वाघिणीने दहशत निर्माण केली आहे. तिने 50हून अधिक लोकांवर आणि जनावरांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात काही जणांना जीवही गमवावा लागला आहे.त्यामुळे या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले होते. याविरूद्ध डाँ जेरिल बानाईत यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती.वाघिण तरूण असल्यामुळे ती प्रजोत्पादन करू शकते. तिला ठार मारलं तर तिची पिढीच नष्ट होईल त्यामुळे तिला ठार मारणं हानीकारक आहे अशी त्यांची भूमीका होती.

दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात येईल पण जर अपयश आले तर गोळ्या घालून ठार करण्यात येईल असं वनविभागाने हायकोर्टाला सांगितले आहे. त्यामुळे ठार मारण्याच्या आदेशास स्थगिती देण्यास हाय कोर्टाने नकार दिला होता. आता वाघिणीला वाचवण्यासाठी व्याघ्रप्रेमी सु्प्रीम कोर्टात धाव घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 09:01 AM IST

ताज्या बातम्या