05 ऑक्टोबर: जवळपास महिनाभर बेमुदत संप पुकारणाऱ्या अंगणवाडी सेविका आज पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहे. पगारवाढ ही अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी असून त्यासाठी त्या आंदोलन करत आहेत.
११ सप्टेंबरपासून राज्यातील ९७ हजार अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांना अनेक राज्यांमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक मानधन देण्यात येते. महाराष्ट्रात मात्र त्या आठ हजार रुपये मानधन देण्याची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या अंगणवाडी सेविकांना पाठिंबा जाहीर केला होता. तर शिवसेनेसह आता काँग्रेसनंही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे .
आज मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा