पुणे पोलिसाला मारहाण करणाऱ्या न्यायधीशाच्या पतीविरोधात अखेर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांच्या वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या न्यायाधीशाच्या पती श्याम भदाणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2017 08:03 PM IST

पुणे पोलिसाला मारहाण करणाऱ्या न्यायधीशाच्या पतीविरोधात अखेर गुन्हा दाखल

17 आॅगस्ट : पुणे पोलिसांच्या वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या न्यायाधीशाच्या पती श्याम भदाणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलीये.

बुधवारी कर्वे रोडच्या नळस्टॉपवर सिग्नल तोडून दुचाकीवर पुढे निघालेल्या वडील आणि मुलीला तिथेच कार्यरत असलेल्या वाहतूक विभागाचे कर्मचारी रवींद्र इंगळे यांनी त्यांना हटकल त्यावर पुढे गेलेले श्याम भदाणे आणि त्यांच्या मुलीने रवी इंगळे यांना मारहाण केली होती.  मात्र वरिष्ठ पोलीस त्याच्या पाठीशी उभे राहाण्याऐवजी पळपुटी भूमिका घेतली होती. काल दिवसभर पोलीस ठाण्यात बसूनही वरिष्ठांनी गुन्हा दाखल करण्याबाबत ठोस भूमिका घेतली नव्हती.

अखेर माध्यमांचा दबाव वाढल्यानंतर रवींद्र इंगळे यांना मारहाण होऊन २४ तास उलटून गेल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याच वाहतूक उपायुक्तांना सांगितलंय. त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या श्याम भदाणेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...