S M L

गडचिरोलीत जिवंत व्यक्तीलाच मृत घोषित केल्याचा कुटुंबियांचा आरोप

जेव्हा घरच्यांनी शवागरातून त्यांचा देह बाहेर काढला तेव्हा मारभते यांच्या चेहऱ्याला फेस आल्याचं कुटुंबियांना आढळून आले. नंतर पुन्हा तपासणी केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मारभते यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 19, 2017 12:51 PM IST

गडचिरोलीत जिवंत व्यक्तीलाच मृत घोषित केल्याचा कुटुंबियांचा आरोप

गडचिरोली 19 ऑगस्ट : रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णाला मृत घोषीत करून दीड तास जिवंत असतानाच शवागारात ठेवल्याचा आरोप गडचिरोलीत करण्यात आला आहे. या घटनेची जिल्हा आरोग्य चौकशी समिती लवकरच चौकशीही करणार आहे.

प्रभू मारभते असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी कॅम्प एरिया येथील प्रभु मारभते यांच्या छातीत दुखायला लागल्यावर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा त्यांचा ईसीजी न करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. ते जिवंत असताना त्यांना दीड तास शवागरात ठेवण्यात आलं. जेव्हा घरच्यांनी शवागरातून त्यांचा देह बाहेर काढला तेव्हा मारभते यांच्या चेहऱ्याला फेस आल्याचं कुटुंबियांना आढळून आले. नंतर पुन्हा तपासणी केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मारभते यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.

वेळेवर योग्य उपचार न झाल्यानेच मारभते यांचा मृत्यू झाला असे मारभते यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. तसंच ज्या डॉक्टरकडे मारभते हे उपचारासाठी गेले होते त्याने मद्यपान केलं असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

रुग्णालय प्रशासनाने मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close