...आणि अक्कलकोटमध्ये पंगतीत बसून मारला वानराने महाप्रसादावर ताव !

जवळपास दहा ते बारा मिनीटं वानराने महाप्रसाद भक्षण करत होता. यानंतर हे वानर स्वतः त्या ठिकाणाहून निघून गेलं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 06:45 PM IST

...आणि अक्कलकोटमध्ये पंगतीत बसून मारला वानराने महाप्रसादावर ताव !

20 फेब्रुवारी: अक्कलकोटच्या अन्नछत्राचा शेकडो भाविक रोज लाभ घेतात. पण आज या अन्नछत्रातील पंगतीला एक वानर येऊन बसलं होतं. हे वानर नुसतं बसलं नाही, तर त्यानं महाप्रसादाचा लाभदेखील घेतला. यावेळी उपस्थित भाविकांसाठी हा कुतुहलाचा विषय ठरला. या वानराला बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत कोट्यवधी भक्तांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अन्नछत्र कक्षात दोन दिवसांपूर्वी हा अनोखा साक्षात्कार स्वामी भक्तांना झालाय. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार एका भक्ताने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात जशा भक्तगणांच्या आख्यायिका सांगितल्या जातात त्याचप्रमाणे याठिकाणी वावरणाऱ्या पशुप्राण्यांच्याही आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

इथली वानरं कधी स्वामींच्या समाधीस्थळ तसंच कधी वटवृक्षाच्या छायेत बसून ध्यान करताना दिसून येतात तर कधी कुत्रा स्वामींच्या मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घालताना दिसतो. आता या आख्यायिकेत आणखी एक भर पडली असून दोन दिवसांपूर्वी अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या एका जोडप्याच्याजवळ चक्क हे वानर येऊन बसलं.

माकडाला पाहून उपस्थित लोकं घाबरले. परंतु या वानराने कोणताही उपद्रव न करता या भाविकाच्या ताटातील महाप्रसाद खाण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे संबंधित भक्ताला याठिकाणच्या आख्यायिका माहिती असल्यानं त्यांनी या वानराला कुठंही विरोध दर्शवला नाही. उलट त्याच वानरासोबत एकाच ताटात या महाप्रसादाचा लाभ घेतला.

जवळपास दहा ते बारा मिनीटं वानराने महाप्रसाद भक्षण करत होता. यानंतर हे वानर स्वतः त्या ठिकाणाहून निघून गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...