'अमूल'कडून दारूविक्रेत्यांना मिल्क बार सुरू करण्याची अाॅफर

अमुलने जवळपास 16 हजार बारमालक आणि दारूविक्रेत्यांसमोर मिल्क बार सुरू करण्याची कल्पना ठेवली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 01:25 PM IST

'अमूल'कडून दारूविक्रेत्यांना मिल्क बार सुरू करण्याची अाॅफर

04 मार्च  :   बारमालक आणि दारूविक्रेत्यांच्या मदतीला अमूल कंपनी धावून आली आहे. बारऐवजी मिल्क बार सुरू करण्याचे प्रस्ताव अमूल कंपनीने ठेवला आहे. जवळपास 16 हजार बारमालक आणि दारूविक्रेत्यांसमोर मिल्क बार सुरू करण्यासाठी अमूल कंपनीने आमंत्रण दिलं आहे.

सुप्रीम कोर्टाने हायवे लगतच्या 500 मीटरच्या अंतरात असणारी दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार या परिसरात असलेल्या हॉटेल्स किंवा बारमध्ये दारूची विक्री करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे एकीकडे स्वागत होत आहे तर दुसरीकडे दारूविक्रेते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. अशातच अमूलने जवळपास 16 हजार बारमालक आणि दारूविक्रेत्यांसमोर मिल्क बार सुरू करण्याची कल्पना ठेवली आहे.

रोजगारनिर्मिती आणि आरोग्यदायी देश निर्माण करण्याचा अमुलचा हा प्रयत्न आहे.त्यामुळे  अमुलच्या या मिल्क बार संकल्पनेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...