S M L

जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही- अमृता फडणवीस

अपघातातून वाचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिला फोन पत्नी अमृता आणि आपल्या आईला करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं.

Sonali Deshpande | Updated On: May 25, 2017 02:27 PM IST

जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही- अमृता फडणवीस

25 मे : 'अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम पाठीशी असल्यावर मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही,' हे उद्गार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडं येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातातून वाचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिला फोन  पत्नी अमृता आणि आपल्या आईला करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं.

IBNलोकमतशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या,' अपघात होऊ नये म्हणून काळजी घ्यायलाच हवी. टेकआॅफ करण्याच्या आधी तांत्रिकदृष्ट्या सर्व नीट तपासून पाहिलं पाहिजे. मग अशा घटना घडणार नाहीत,' त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी दौरे करतात, तेव्हा अनेकदा हेलिकाॅप्टरनं प्रवास करणं गरजेचं असतं. त्यांच्यासाठी सगळ्यांनीच प्रार्थना करावी.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2017 02:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close