अमरावती : विदर्भ पाटबंधारे मंडळाची रेकॉर्ड रूम जळून खाक, आग लागली की लावली ?

काही दिवसांपूर्वी या विभागाला मशनरी चालवण्याकरिता पेट्रो कार्ड दिले होते, मात्र अधिकाऱ्यांनी पेट्रो कार्डवर पेट्रोल, डिझेल न घेता,रोख घेतल्याचे दाखवले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2018 01:33 PM IST

अमरावती : विदर्भ पाटबंधारे मंडळाची रेकॉर्ड रूम जळून खाक, आग लागली की लावली ?

13 मार्च : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उर्ध्व वर्धा धरण विभागातील रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली होती. या आगीत रेकॉर्ड रूममधील महत्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहे. मात्र,   जलसंपदा घोटाळा लपवण्यासाठी ही आग लावल्याचा संशय व्यक्त होतं आहे.

अमरावती शहराच्या कॅम्प परिसरात असलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उर्ध्व वर्धा धरण (मेकॅनिकल सेक्षण)विभागातील रेकॉर्ड रूमला आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलाला याची माहिती दिली मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

त्यामुळे या आगीत कार्यालयातील सर्व महत्वाचे कागदपत्रे फाईल्स,लाकडी फर्निचर,कपाट जळून राख झाले होते. सकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालय फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे.  ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं सांगितलं जातंय.

काही दिवसांपूर्वी या विभागाला मशनरी चालवण्याकरिता पेट्रो कार्ड दिले होते, मात्र अधिकाऱ्यांनी पेट्रो कार्डवर पेट्रोल, डिझेल न घेता,रोख घेतल्याचे दाखवले. यात मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला, हा घोटाळा लपवण्यासाठी ही आग लावण्यात आल्याचं बोलले जात आहे. मात्र अधिकारी यावर बोलायला तयार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...