शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा बालवाडीत 'प्रवेश'!

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2019 06:17 PM IST

शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा बालवाडीत 'प्रवेश'!

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 09 जानेवारी : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांबाबत अपशब्द वापरून अटक करण्याचे आदेश एका कार्यक्रमात दिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत चक्क त्यांना बालवाडीत प्रवेश दिला आहे.

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे संतप्त पडसाद जिल्हाभर उमटू लागले आहे. आज युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे.

'भाजपचा शिक्षणमंत्री बालिश असून त्यांना विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचं खातं सरकारनं दिलं. मात्र, विनोद तावडे हे लायक नसून त्यांना पुन्हा नर्सरी (बालवाडी)पासून शिक्षण घ्यावं', अशी टीका करत कार्यकर्त्यांनी तावडे यांच्या नर्सरी(बालवाडी) प्रवेशाचा अर्जच सुरवाडी येथील निर्मल किड्स प्री प्रायमरी येथील मुख्याध्यापकांना दिला आहे.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन विनोद तावडे यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी करून तहसीलदार मिताली सेठी यांना निवेदन दिले आहे.

Loading...

काय म्हणाले होते तावडे?

शहरात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात 'आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?’ असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे उत्तर विनोद तावडे यांनी दिले होते. शिवाय, 'त्याचे चित्रीकरण करणाऱ्या अन्य विद्यार्थ्याला अटक करा', असे आदेश त्यांनी दिले होते.


===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...