श्रद्धा की अंधश्रद्धा ?, काट्यावर झोपून बाबाचा अघोरी उपवास !

श्रद्धा की अंधश्रद्धा ?, काट्यावर झोपून बाबाचा अघोरी उपवास !

धारणी येथील कालिंका मातेच्या मंदिरातील पुजारी मनिराम बाबा यांनी चक्क बाबळीच्या झाडावरील काट्यावर झोपून उपवास सुरू केला

  • Share this:

 

अमरावती, 23 मार्च : जिल्ह्यातील धारणी येथील कालिंका मातेच्या मंदिरातील पुजारी मनिराम बाबा यांनी चक्क बाबळीच्या झाडावरील काट्यावर झोपून उपवास सुरू केला होता. मात्र गावातील भाविकांनी या बाबांना काटेरी गादीवरून खाली उतरवलं.

चैत्र नवरात्राच्या सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील कालिंका मातेच्या मंदिरातील पुजारी मनिराम बाबा यांनी चक्क बाबळीच्या झाडावरील काट्यावर झोपून सोबतच पोटावर अखंड दिवा ठेवून उपवास सुरू केले. हे पाहण्यासाठी हिंदू-मुस्लीम मोठ्या संख्येने बाबांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.

मात्र, गावातील काही प्रतिष्ठित भक्तांनी मनिराम बाबा यांना काट्यावरून उतरायला भाग पाडले. यावेळी मनिराम बाबाजवळ मध्यप्रदेश येथील आणि मेळघाट मधील अनेक आदिवासी बाबा उपस्थित होते. आता ही श्रद्धा होती की अंधश्रद्धा याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो.

मात्र मनिराम बाबांची ही अनोखी तपस्या सध्या मेळघाट सोबतच बाजूच्या राज्यात अर्थात मध्यप्रदेशमध्ये जोरात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2018 01:57 PM IST

ताज्या बातम्या