अमित शहांच्या सभेसाठी जाताना कार्यकर्त्याचा रेल्वेनं कापला गेला पाय, भाजपने फिरवली पाठ

अमित शहांच्या सभेसाठी जाताना कार्यकर्त्याचा रेल्वेनं कापला गेला पाय, भाजपने फिरवली पाठ

आज सात-आठ महिन्यानंतर भाजप नेत्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही.

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 31 जानेवारी : राजकीय पक्षाच्या सभांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना आणण्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. मात्र, एखाद्या कार्यकर्त्यावर अनिष्ठ प्रसंग आला तर मात्र कोणताही राजकीय पक्ष त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अशीच काहीशी घटना अमरावतीमध्ये सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यासोबत घडली आहे.

5 एप्रिल 2018 रोजी मुंबई इथं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना मुंबईला नेण्यात आले होते. अमरावती वरूनही कार्यकर्त्यांनी देण्यासाठी भाजपने स्पेशल रेल्वे बुक केली होती.

अमरावती जिल्ह्यातील निंभोरा लाहे येथील बळीराम साखरकर हे भाजपच्या किसान सभेचे कार्यकर्ते आहे. त्यांनाही पक्षाकडून रेल्वे तिकीट काढून मुंबईला बोलावले होते. ही गाडी भुसावळ इथं वीस मिनिटं थांबणार होती. मात्र, कुठली पूर्व सूचना न देता अचानक 15 मिनिटानंतर रेल्वे सुरू झाली. यामुळे रेल्वेतून खाली उतरलेल्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली, पाणी प्यायला उतरलेल्या बळीराम साखरकर हे ट्रेनमध्ये बसायला गेले असता गाडीने वेग घेतल्याने रेल्वेखाली पडले आणि यात त्यांचा एक पाय पूर्णपणे कापला गेला.

भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. भाजप नेत्यांनीही त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना रुग्णालयाचा पूर्ण खर्च आणि अपंगत्व आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत देऊ असं आश्वासन दिलं होते. मात्र, आज सात-आठ महिन्यानंतर भाजप नेत्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही.

एवढंच नाहीतर त्यांच्या रुग्णालयाला लागणारा खर्चही न दिल्यानं आज साखरकर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

बळीराम यांची अवस्था पाहून त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर होतात. अमरावतीचे पालकमंत्री पोटे, अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांनीही साखरकर कुटुंबीयांची घोर निराशा केल्याचं साखरकर यांनी सांगितलं.

=====================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या