अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीसाठी सकारात्मक घडामोड, अमोल कोल्हेंनी दिला 'हा' शब्द

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 03:20 PM IST

अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीसाठी सकारात्मक घडामोड, अमोल कोल्हेंनी दिला 'हा' शब्द

मुंबई, 25 जुलै : लोकसभेतील पराभव आणि त्यानंतर होत असलेलं आऊटगोईंग यामुळे राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतच आता अमोल कोल्हे यांनीही भाष्य केलं आहे.

'आदरणीय श्री. शरद पवारसाहेब, अजितदादा पवार, जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जबाबदारी माझ्यावरती सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे,' असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आगामी काळात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांनी विजय मिळवत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक कार्यक्रमांना अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित असतात. त्यानंतर नुकतंच अजित पवार यांनी पुण्यातील भोसरी इथं बोलताना अमोल कोल्हे यांना राज्यात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. 'अमोल कोल्हे हे निवडणुकीनंतर भोसरी इथं येत नाहीत, अशी तक्रार करू नका. ते दिल्लीत चांगलं काम करत आहेत. तसंच आगामी निवडणुकीतही त्यांना राज्यातील राष्ट्रवादीच्या इतर मोठ्या नेत्यांप्रमाणे जबाबदारी द्यायची आहे,' असं अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले होते. त्यामुळे अमोल कोल्हे यांना राज्यस्तरावर राष्ट्रवादीकडून ताकद देण्यात येण्याची शक्यता आहे.

ज्यांच्यामुळे सत्ता भोगली त्या पवारसाहेबांना काय वाटत असेल? राष्ट्रवादीच्या नेत्याचा अहिरांना सवाल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...