'शेवटच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांसोबतच राहणार', अमोल कोल्हेंसह कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 03:02 PM IST

'शेवटच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांसोबतच राहणार', अमोल कोल्हेंसह कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

पुणे, 1 ऑगस्ट : पुणे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'युवा संवा' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी सर्व कार्यकत्यांनी खा.डॉ अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पक्षाप्रती निष्ठावान राहण्याची शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. हेच आऊटगोईंग रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून नवा फंडा अवलंबण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 'माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही,' असं म्हणत कार्यकर्त्यांनी नेहमीच राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचा निश्चय केला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शपथ

'मी आज शपथ घेतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. आदरणीय श्री शरदराव पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे. गेली 55 वर्षे ज्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण केला, अशा पावरसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यास मी सदैव तत्पर राहीन. माझ्या शरीरात जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही.जयहिंद!जय महाराष्ट्र ! जय राष्ट्रवादी !'

VIDEO: नितीन गडकरींना राष्ट्रगीतावेळी पुन्हा आली भोवळ

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...