News18 Lokmat

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानसभेआधी राजकारणाला कलाटणी?

धानसभा निवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 12:13 PM IST

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानसभेआधी राजकारणाला कलाटणी?

मुंबई, 12 जून : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचं अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

अमोल कोल्हे कसे झाले खासदार?

शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत शिवसेनेची मदार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरच होती. शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली.

या निवडणुकीच्या निकालात अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा हा अभेद्द समजला जाणारा बालेकिल्ला सर केला आहे. डॉ. अमोल कोल्हे हे 58483 मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचं संघटन आणि स्वत:ची प्रतिमा यासोबत अमोल कोल्हे जिंकून येण्यामागे इतरही अनेक कारणं आहेत.

Loading...

अमोल कोल्हेंच्या विजयामागील सर्वात मोठं कारण ठरलं ते प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक वक्तव्य. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख केला.

'तुमच्याविरोधात एका तगडा मराठा उमेदवार देण्यात आलाय, त्यावर तुमचं मत काय?' असा प्रश्न आढळराव यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आढळराव यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख करत ते माळी समाजाचे असल्याचं सांगितलं. त्यामुळे निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी आढळरावांनी जातीचं राजकारण केल्याची चर्चा सुरू झाली. याचाच आढळराव यांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ माळी समाजाचीही लक्षणीय संख्या आहे. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असल्याने मराठा समाजासह सर्वच समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे आढळराव यांना अमोल कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख करणं महागात पडल्याचं निकालातून दिसून आलं आहे.


VIDEO : प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...