युतीच्या चर्चेचं केंद्र पुन्हा मातोश्रीच! गडकरी, शाह आणि राजनाथ सिंह चर्चेसाठी जाण्याची शक्यता

शिवसेनेकडून युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2019 02:48 PM IST

युतीच्या चर्चेचं केंद्र पुन्हा मातोश्रीच! गडकरी, शाह आणि राजनाथ सिंह चर्चेसाठी जाण्याची शक्यता

मुंबई, 13 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच आता युतीची चर्चा ट्रॅकवर आणण्यासाठी आता भाजपचे दिल्लीतील मोठे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेकडून युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच मग आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठीच आता भाजपचे हे तीन दिग्गज नेते मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात युतीचा बिहार पॅटर्न?

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वांच्या मुखी एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवसेना – भाजप युतीचं काय? युती होणार कि स्वबळावर लढणार? कोण जिंकणार सर्वाधिक जागा? अशातच शिवसेनेनं भाजपसमोर 1995च्या फॉर्म्युल्यानुसार चालण्याचा आग्रह धरल्यानं भाजप शिवसेनेसमोर नमते घेणार का? अशी चर्चा सध्या दिवसभर रंगताना दिसत आहे. या साऱ्या घडामोडींकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण देखील 'बिहार'च्या वाटेवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय झालं बिहारमध्ये?

Loading...

कारण, बिहारमध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटप करताना भाजपनं जदयू समोर अर्थात नितीश कुमार यांच्यापुढे नमतं घेतलं. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा लढवेल असा फॉर्म्युला ठरला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

पण, बिहारमधील नितीश कुमार यांचं वाढतं महत्त्व लक्षात घेता भाजपनं नितीश कुमार यांच्यासमोर नमतं घेतल्याचं चित्र पाहायाला मिळालं. त्यामुळे शिवसेनेना ताठर भूमिका घेत नितीश कुमार यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे भाजप देखील 'चक्रव्युहात' अडकल्याचं पाहायाला मिळत आहे.

मित्र पक्षांची नाराजी भाजपला परवडेल?

भाजप त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी – अमित शहा जोडीवर टीका करत मित्रपक्षांनी आपली नाराजी उघड केली आहे. चंद्रबाबु नायडू अर्थात टीडीपीनं भाजपचा पाठिंबा काढत एनडीएतून बाहेर काढत 'सवता सुभा' मांडला. शिवाय, विशेष राज्याच्या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारविरोधात अविश्वास ठराव देखील मांडला.

दुसरीकडे शिवसेनेनं देखील भाजपविरोधातील टीकेचा सूर आणखी 'तीव्र' केला असून संधी मिळेल त्या ठिकाणी शिवसेना भाजपवर टीकास्त्र डागत आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण पाहता मित्र पक्षांची नाराजी भाजपला परवडेल का? हा देखील गहण मुद्दा आहे.


VIDEO : 'बेडूक किती फुगले तरी बैल होत नाही,' मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...