S M L

नारायण राणे आज घेणार अमित शहांची भेट

या कार्यकारिणीनंतर सिंधुदुर्गात उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजप अध्यक्ष अमित शहांची वेळ घेण्यासाठी नारायण राणे दिल्लीत गेल्याचं बोललं जात आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 10:23 AM IST

नारायण राणे आज घेणार अमित शहांची भेट

दिल्ली,25 सप्टेंबर: काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे आज दिल्लीत जाणार आहे.या दिल्लीवारीत राणे आज अमित शहांची भेट घेणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

आज दिल्लीत भाजपच्या कार्यकारिणीची विशेष बैठक होते आहे.गेले दोन दिवस चाललेल्या या बैठकीचा आज समारोप होणार आहे.तर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर नारायण राणेंची ही पहिलीच दिल्लीवारी आहे. नारायण राणे अमित शहांना भेटणार असल्याचं सांगितलं जातंय. या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर नारायण राणे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या कार्यकारिणीनंतर सिंधुदुर्गात उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजप अध्यक्ष अमित शहांची वेळ घेण्यासाठी नारायण राणे दिल्लीत गेल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान भाजपच्या बैठकीत सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. 2019ची लोकसभा निवडणूक आणि यादरम्यान होणाऱ्या ,विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आज निश्चित होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप नेत्यांना संबोधित करतील. सकाळी 10 वाजता भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणाने बैठकीला सुरुवात होईल .बैठकीत राजनैतिक प्रस्ताव , राजकीय प्रस्ताव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 09:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close