News18 Lokmat

'उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये 'फोन पे चर्चा' झालीच नाही'

'बदलत्या राजकीय परिस्थितीत 1995 चा राजकीय फॉर्म्युला कुणी सांगेल का?'

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 04:58 PM IST

'उद्धव ठाकरे आणि  अमित शहांमध्ये 'फोन पे चर्चा' झालीच नाही'

मुंबई 12 फेब्रुवारी : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे लोकसभेसाठी उमेदवारही निश्चित झालेत. तर युतीचं अजुनही तळ्यात-मळ्यातच सुरू आहे. सोमवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचं वृत्त आलं होतं. मात्र अशी कुठलीही चर्चा झालीच नाही असं स्पष्टीकरण अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. जेव्हा चर्चा होईल तेव्हा कळेलच असंही ते म्हणाले.

युती व्हावी ही भाजपची मागणी आहे. आम्ही जाहीरपणे  युती व्हावी असं मत व्यक्त केलंय असंही त्यांनी सांगितलं. त्याच बरोबर बदलत्या राजकीय परिस्थितीत 1995 चा राजकीय फॉर्म्युला कुणी सांगेल का? असा सूचक सवालही त्यांनी केला. शिवसेना 1995 च्या फॉर्म्युल्यावर कायम असल्याची म्हटलं जात असताना मुनगंटीवर यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

काय आहे 1995 चा फॉर्म्युला

शिवसेनेला 1995 प्रमाणे जागा हव्य़ा आहेत. त्यावेळी विधानसभेसाठी शिवसेनेने 169 तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. तेव्हा दोन्ही पक्षांनी 138 जागा जिंकून राज्यात पहिले युतीचे सरकार स्थापन केले होते. त्या सूत्रानुसार युती सरकार आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्र निवडणू्क लढवली आणि सेनेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. त्यामुळे आता विधानसभेत 122 संख्या बळ असणारा भाजप 1995च्या सूत्रानुसार 116 जागा लढवणार का, हा मोठा प्रश्न आहे.

मोठा भाऊ कोण?

Loading...

राज्यात मोठा भाऊ नेहमी शिवसेनेच असेल ही भूमिका शिवसेनेने आधीपासून मांडली आहे. या भूमिकेपासून पक्ष कधीही माघार घेणार नाही असे सेनेतील सूत्रांनी सांगितले आहे. याउलट भाजपला आधी लोकसभा निवडणुकीचे बघू मग विधानसभेचे जागावापट करू असे वाटते. जोपर्यंत भाजप मोठ्या भावा संदर्भातील निर्णय घेत नाही तोपर्यंत युती संदर्भात अंतिम निर्णय होणार नाही हे यावरून स्पष्ट होते.

भाजपला हवेत जुने मित्र सोबत

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी विरोधात विरोधकांनी महाआघाडी तयार केल्याने भाजपला मित्र पक्षांची गरज आहे. यात टीडीपी, एरएलएसपी, आसम गण परिषद NDAतून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील समावेश आहे. सोबत काही नवे मित्र भेटले तरी भाजपला हवे आहेत.

VIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवारबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...