आंबोलीच्या दरीतून दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह बाहेर काढला

आंबोलीच्या दरीतून दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह बाहेर काढला

गडहिंग्लजच्या इम्रान गारदी याचा मृतदेहही बाहेर काढण्यात बचावपथकाला तब्बल पाच दिवसांनी यश आलंय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

05 आॅगस्ट :  आंबोलीतील कावळेसाद पाँईटच्या दरीत दारूच्या नशेत कोसळलेल्या गडहिंग्लजच्या इम्रान गारदी याचा मृतदेहही बाहेर काढण्यात बचावपथकाला तब्बल पाच दिवसांनी यश आलंय.

आज (शनिवार) दुपारी तीनच्या सुमारास गारदी याचा मृतदेह दरीतून दोरखंडाने वर काढण्यात आला. त्याचा दुसरा साथीदार प्रताप राठोड याचा मृतदेह काल दुपारी काढण्यात आला होता.

आज दुपारी तीनच्या सुमारास गारदी याचा मृतदेह बाबल अल्मेडा यांच्या तसंच पुण्याच्या पथकानं दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढला.

पाऊस, बोचरे वारे, दाट धुके याचा सामना करीत आज सकाळपासून याबाबत प्रयत्न सुरू होते. तब्बल पाच दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह सडण्याच्या प्रकारास सुरुवात झाली होती. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्वरित शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सोमवारी दारुच्या नशेत या दोघांचाही कावळेसादच्या दरीत तोल गेला होता. तेव्हापासून या दोघांच्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

अखेर दुर्घटनेनंतर पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पाऊस, वारा आणि धुक्याशी झुंजत या पथकातील जिगरबाज तरुणांनी प्रशासनाच्या कोणत्याही मदतीविना हे दोन्ही मृतदेह काढण्यात यश मिळवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 04:56 PM IST

ताज्या बातम्या