आंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळे ? तपास चक्र सुरू

आंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळे ? तपास चक्र सुरू

मृतांच्या कुटुंबीयांनी प्रकाश सावंत हेच गाडी चालवत होते आणि अपघात होताना त्यांना लक्षात आले असता त्यांनी गाडीतून उडी टाकली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला असून या घटनेची सखोल आणि वरीष्ठ पातळींवर चौकशी व्हावी अशा मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : २८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास अंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणा-या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्य कारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र, आता हेच प्रकाश सावंत संशयाच्या भोवऱ्यांत अडकले आहेत. कारण मृतांच्या कुटुंबीयांनी प्रकाश सावंत हेच गाडी चालवत होते आणि अपघात होताना त्यांना लक्षात आले असता त्यांनी गाडीतून उडी टाकली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला असून या घटनेची सखोल आणि वरीष्ठ पातळींवर चौकशी व्हावी अशा मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

बसमधील ३१ जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले? ते नेमके कुठे बसले होते? ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले? शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले? प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली? अशा प्रकारचे अनेक प्रश्न मृतांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेत. मृतांच्या कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपानंतर रायगड पोलीस प्रकाश सावंत देसाई यांची चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी न्युज १८ लोकमतला दिली. या संपुर्ण घटनेची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहीलय.

खरं तर हे आरोप होण्याआधीच पोलिसांनी प्रकाश सावंत यांच्या आश्चर्यकारक रितीने बचावण्यावरच चर्चा केली होती. म्हणजेच घटनेच्या दुस-या दिवशीच रायगड पोलिसांनी अपघात कसा घडू शकतो आणि प्रकाश सावंत देसाई कसे वाचू शकतात या दृष्टीने घटनास्थळावरच आपापसात चर्चा केली होती. आणि घटनेच्या चौथ्या दिवशी रायगड पोलिसांनी प्रकाश सावंत देसाई यांना पुन्हा जबाब घेणार असल्याचे फोनवरुन कळवले होते. त्यामुळे आता प्रकाश सावंत देसाई यांनी नवीन काय जबाब दिलाय किंवा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. पण मृतांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची चौकशी करुन उत्तर मिळाल्या शिवाय या घटनेबाबत सत्य-असत्य काय? हे स्पष्ट होणार नाही. मृतांच्या कुटूंबियानी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी पोलीस तपासाची चक्रे फिरु लागली असून, आंबेनळी घाट अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे घडला? वाचलेली व्यक्तीच गाडी चालवत होती का? या सर्व बाबी पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहेत.

बसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो

पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात झालाय. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहलीला निघालेली बस या दरीत कोसळून त्यामध्ये 33 जण ठार झालेत. ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत फक्त प्राध्यापक प्रकाश सावंत देसाई हे सुखरूप वाचले. दरीतून बाहेर येऊन त्यांनी फोन करून अपघाताची माहिती दिली.

नेमकं काय घडलं होतं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.

हेही वाचा..

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक - मुख्यमंत्री

कल्याणच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचा गोंधळ, बाहेरचे पदार्थ न्यायला बंदी घातल्यानं निषेध

VIDEO : नाश्कात मराठा आरक्षणासाठी बोंबाबोंब आंदोलन!

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 08:17 PM IST

ताज्या बातम्या