S M L

बसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

Updated On: Jul 28, 2018 05:35 PM IST

बसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

रायगड, 28 जुलै : पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात झालाय. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहलीला निघालेली बस या दरीत कोसळून त्यामध्ये 33 जण ठार झालेत. ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत फक्त प्राध्यापक प्रकाश सावंत देसाई हे सुखरूप वाचले. दरीतून बाहेर येऊन त्यांनी फोन करून अपघाताची माहिती दिली.

काय घडलं नेमकं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

Bus Accident Update : पोलादपूर बस अपघातात ३२ जणांचा मृत्यू, 1 बचावला

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.

 भीषण अपघातातील मृतांची नावं

1. संतोष झगडे

2. सचिन झगडे

3. संजीव झगडे

4. संदिप झगडे

5. राजाराम गावडे

6. पंकज कदम

7. सुनिल कदम

8. निलेश तांबे

9. सचिन गिम्हवणेकर

10. रितेश जाधव

11. हेमंत सुर्वे

12. राजेश सावंत

13. रोशन तबीब

14. किशोर चौगुले

15. विक्रांत शिंदे

16. राजू रिसबुड

17. रत्नाकर पागडे

18. प्रमोद जाधव

19. संदिप सुर्वे

20. प्रमोद शिगवण

21. संदीप भोसले

22. जयंत चौघुले

23. राजू बंडवे

24. संतोष जळगावकर

25. सुनील साठले

26. रविकिरण साळवी

27. प्रशांत भांबेड (बसचालक)

28. एकमेव बचावले - प्रकाश सावंत देसाई

कसा आहे आंबेनळी घाट?-

सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यात वाडा इथे हा घाट

कुंभरोशी  घाटपायथ्याचे तर महाबळेश्वर  घाटमाथ्याचे गाव

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर रस्ता

महाड- महाबळेश्वर गाडी रस्ता

ह्या घाटातून प्रतापगड, चंद्रगड इथं जाता येते

वळणावळणाचा हा घाट धोकादायक

हा पूर्ण मार्ग अत्यंत अरूंद आहे

या घाटरस्त्याच्या एका बाजूला खोल दरी

पोलादपूर तालुका हद्दीत 20 किमीचा रस्ता

आंबेनळी घाट ऐतिहासिक 150 वर्षं जुना

महाबळेश्वर हिलस्टेशन म्हणून विकसित केल्यानंतरचा रस्ता

तळकोकण आणि मुंबई बेटातून येण्यासाठी इंग्रजांनी हा घाटमार्ग बांधला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close