S M L

आंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

आज बस दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब आणि नातेवाईक प्रकाश सावंत यांना 'फाशी द्या फाशी द्या' अशा घोषणा देत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले.

Updated On: Sep 28, 2018 05:51 PM IST

आंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

शिवाजी गोऱ्हे, दापोली, 29 आॅगस्ट : आंबेनळी घाटात भीषण बस अपघातात दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव वाचले होते. आज बस दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब आणि नातेवाईक प्रकाश सावंत यांना 'फाशी द्या फाशी द्या' अशा घोषणा देत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले. आंबेनळी घाटातील हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

तसंच देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केलीये.

२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले.

आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मृतांच्या नातेवाईकांनी दापोली कृषी विद्यापीठावर धडक मोर्चात सहभागी झाले होते. प्रकाश सावंत देसाईला बडतर्फ करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीसाठी दापोली राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेना भांडुप आमदार अशोक पाटील, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नातेवाईक कृषी विद्यापीठावर धडकले. नातेवाईकांचा आक्रोश पाहून कोकण कृषी विद्यापीठाने चौकशी सुरू असेपर्यंत प्रकाश सावंत देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची ऑर्डर कुलगुरू तपस भट्टाचार्य यांनी काढली आहे.

Loading...
Loading...

याआधीही या संपूर्ण घटनेची वरीष्ठ पातळींवर उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय. तसंच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केलीये.

मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल प्रश्न

बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?

ते नेमके कुठे बसले होते?

ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?

शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?

प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?

खरं तर हे आरोप होण्याआधीच पोलिसांनी प्रकाश सावंत यांच्या आश्चर्यकारक रितीने बचावण्यावरच चर्चा केली होती. आणि त्यानंतर प्रकाश सावंत देसाईंचा पुन्हा जबाब घेणार असं त्यांना कळवलंही. त्यामुळे कदाचित त्या अपघाताचं आणि मृत्युचं रहस्य उलगडु शकेल असा पोलिसांना अंदाज आहे.

पण या घटनेचा एकमेव साक्षीदार असल्यानं पोलीस त्यांची चौकशी करतायत. मात्र त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्समध्ये तफावत आढळुन येत आहे. पोलीस अपघाताशी त्यांचाच काही संबंध असल्याचंही तपासात असल्यानं चौकशी करत आहे. पण त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचं प्रकाश सावंत देसाई यांनी सांगितलंय.

तेव्हा देसाई काय म्हणाले होते ?

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असतीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत खोल दरीत गेलो असतो. झाडांचा बुंधा पकडला, तरी हात सटकत होता...कधी मातीत हात घालून, तर कधी झाडांना पकडून कसाबसा वर आलो. बस कोसळ्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि मुंबईला निघून गेला. मला जे नंबर आठवत होते त्यांना फोन केला. मला माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर पाठ होतो तिथे फोन केला. मग त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. घाटात रस्त्यावर मातीच्या ढिगार होते त्यावरून बसचे चाक घसरले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरतच गेली. मला जी नावं आठवत होती ती सगळी नावं सांगितली.

बस दरीत कोसळण्याआधी काय घडलं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

मृतांच्या वस्तू गायब

अपघातानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या वस्तू पोलिसांनी राखून ठेवल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करून त्या मृतांच्या नातेवाईकांना सुपूर्द केल्यात. पण यातील काही वस्तू गायब असल्याचं निदर्शनास आलंय.

------------------------------------------------------------------------

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 05:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close