S M L

आंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर?

अपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होत्या अशी धक्कादायक माहिती या अपघातात समोर आली आहे.

Updated On: Aug 30, 2018 01:50 PM IST

आंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर?

दापोली, 30 ऑगस्ट : आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तर प्रकाश सावंत यांच्या विऱोधात बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढला. तर दुसरीकडे दापोली विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल अखेर सादर केलाय. या अहवालात प्रकाश सावंत देसाई यांनी क्लिन चिट देण्यात आलीये. पण, अपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होत्या असंही नमूद केलंय.

दरम्यान, याच घटनेचा पुरावा देणार एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ घाटातून जाणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांनी शूट केलेला आहे. यात तुम्ही पाहू शकता की, कृषी विद्यापीठाची बस ही घाटामध्ये थांबली होती आणि त्यातून बसचा ड्रायव्हर खाली उतरताना दिसत आहे. त्यामुळे अपघातापूर्वी दोन जणांनी गाडी चालवली असल्याचा दावा या अपघातात करण्यात आला आहे.

आंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल

दापोली कृषी विद्यापीठाच्या वतीने 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने घटनेशी संबंधीत व्यक्तींची चौकशी करून निष्कर्ष काढला.

- 6 जुलै 2018 रोजी 40 कर्मचाऱ्यांनी सहलीसाठी बसची मागणी केली होती. त्यानंतर रोहा येथून एमएच 08 ई 9087 ही बस मागवण्यात आली.

Loading...
Loading...

- 28 जुलैला जेव्हा सहल निघाली तेव्हा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बसला बाहेर जाताना पाहिले. या बससाठी दोन चालक होते. मुख्य बसचालक प्रशांत भांबीड आणि सहाय्यक संदीप झगडे.

- प्रवासादरम्यान बसमधील वाहनचालक दोनदा बदलण्यात आले होते. बसची स्थितीही चांगली होती. पण त्यानंतर आंबेनळी घाटात बसला अपघात झाला.

- प्रकाश सावंत देसाई यांच्या सांगण्यानुसार अपघाताच्या वेळी प्रशांत भांबीड हे बस चालवत होते. मातीच्या ढिगारावरून बसचे टायर घसरले आणि बस दरीत कोसळली असं सावंत यांनी सांगितलं.

एकंदरीतच जे सावंत यांनी सांगितलं आणि ज्यासाठी बसची मागणी झाले इथंपर्यंतची माहिती अहवालातून स्पष्ट करण्यात आली. मात्र, प्रकाश सावंत यांनी वेगवेगळी विधान केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला हे पोलीस तपासातूनही पुढे आलं.

तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी या समितीचा अहवाल येण्याआधीच सीआयडी आणि प्रशांत सावंत यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केलीये. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रव्यवहार केलाय. तसंच विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवलंय.

दापोली विद्यापीठाच्या अहवालात अपघाताच्या वेळी प्रशांत भांबीड हे बस चालवत होते. त्यामुळे प्रशांत सावंत देसाई यांनी क्लिन चीट देण्यात आली आहे. पण मृतांच्या नातेवाईकांनी प्रशांत सावंत हेच गाडी चालवत होते असा आरोप केला. त्यामुळे नेमकं बस कोण चालवत होते असा प्रश्नचिन्ह कायम आहे.

 

आपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 01:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close