आंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली!

आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2018 10:59 AM IST

आंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली!

रत्नागिरी, 14 सप्टेंबर : आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन अपघातातून वाचलेले प्रकाश सावंत-देसाई यांची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दापोली कृषी विद्यापीठातून त्यांची रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.

२८जुलैच्या सकाळी साडे १०च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला एक महिना उलटून गेलाय. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले. मात्र या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झालेत. स्थानिक लोकांपासून ते मृतांच्या नातेवाईकांपर्यंत सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत यांच्या विरोधात 30 आॅगस्टला विद्यापीठावर मोर्चा काढला. तर दुसरीकडे दापोली विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल सादर केला होता. त्या अहवालात प्रकाश सावंत-देसाई यांना क्लिन चिट देण्यात आली होती. पण, अपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होते असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

एकंदरीतच जे सावंत यांनी माध्यमांना सांगितलं आणि ज्यासाठी बसची मागणी झाली इथपर्यंतची माहिती अहवालातून स्पष्ट करण्यात आली. मात्र, प्रकाश सावंत यांनी वेगवेगळी विधानं केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला हे पोलीस तपासातूनही पुढे आलं.

तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी या समितीचा अहवाल येण्याआधीच सीआयडी आणि प्रशांत सावंत यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रव्यवहार केला होता. तसंच विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवावं याचीही मागणी करण्यात आली होती. त्यांच्या या भावना लक्षात घेत सावंत यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

Loading...

 

दगडूशेठ हलवाई गणपतीचा नयनरम्य देखावा ड्रोनमधून पहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 10:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...