S M L

आंबेनळी अपघात : मृतांच्या नातेवाईकांचा संयम सुटला, केली प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

आंबेनळी घाटातील बस अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असून आज या अपघातातील मृतांचे नातेवाईक हे कोकण कृषी विद्यापीठात घुसले आहेत.

Updated On: Aug 29, 2018 02:00 PM IST

आंबेनळी अपघात : मृतांच्या नातेवाईकांचा संयम सुटला, केली प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

रत्नागिरी, 29 ऑगस्ट : आंबेनळी घाटातील बस अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असून आज या अपघातातील मृतांचे नातेवाईक हे कोकण कृषी विद्यापीठात घुसले आहेत. या अपघातात एकट्या बचावलेल्या प्रकाश सांवत देसाईला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जर यात ते दोषी निघाले तर त्यांना कामावरून बडतर्फ करा असंही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रकाश सावंत देसाई यांना फाशीची शिक्षा द्या अशा घोषणादेखील नातेवाईकांनी विद्यापीठात दिल्या आहेत.

२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. 31 जणांपैकी 30 जणांचा जागीच मृत्यू होतो आणि एक इसम कसा वाचू शकतो?  असा आरोप करुन कुटुंबियांनी प्रकाश सावंताच्या बचावण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल प्रश्न

- बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?

- ते नेमके कुठे बसले होते?

- ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?

- शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?

- प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?

काय म्हणाले होते देसाई ?

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असतीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत खोल दरीत गेलो असतो. झाडांचा बुंधा पकडला, तरी हात सटकत होता...कधी मातीत हात घालून, तर कधी झाडांना पकडून कसाबसा वर आलो. बस कोसळ्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि मुंबईला निघून गेला. मला जे नंबर आठवत होते त्यांना फोन केला. मला माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर पाठ होतो तिथे फोन केला. मग त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. घाटात रस्त्यावर मातीच्या ढिगार होते त्यावरून बसचे चाक घसरले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरतच गेली. मला जी नावं आठवत होती ती सगळी नावं सांगितली.

नेमकं काय घडलं होतं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.

 

फाटलेल्या नोटा बदलण्याचा सोपा उपाय, 'RBI'ने सांगितले हे चार नियम

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close