News18 Lokmat

चोरट्यांनी पळवली ५ लाखांची अंडी

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 21, 2018 01:51 PM IST

चोरट्यांनी पळवली ५ लाखांची अंडीगणेश गायकवाड, प्रतिनिधी


अंबरनाथ, 21 नोव्हेंबर : १ लाख ४१ हजार नग कोंबड्यांची अंडी ट्रकसह पळवल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. या अंड्यांची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्काच बसेल.

Loading...


या चोरलेल्या अंड्याची किंमत ५ लाखांच्या घरात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर येथून मोहमंद नबी उस्मानसाहेब शेख हा ट्रकचालक त्याचा मुलगा मुजम्मिल सुमारे १ लाख ४१ हजार नग ५ लाख रूपये किंमतीची ती अंडी ट्रकमधून घेवून अंबरनाथकडे निघाले होते.


त्या अंडयाची ऑर्डर महाराष्ट्र एग्ज सेंटर यांच्याकडे द्यायची होती. तो ट्रक पहाटेच्या सव्वा ३ च्या सुमारास अंबरनाथ येथील टी सर्कल ग्रीनसीटीच्या बाजूने येत असताना ट्रकच्या पाठीमागून फोरव्हीलर कार मधून आलेल्या ४ जणांच्या टोळीने तो ट्रक थांबवला.


त्यांनी ट्रकचालक मोहमंद शेख आणि त्यांचा मुलगा यांना ठोशाबुक्कयाने मारहाण करून त्यांच्या डोळयाला कापडी रूमाल बांधून त्यांच्या खिशातील २ हजाराची रोख रक्कम, मोबाईल फोन काढून घेतला. त्यानंतर त्या दोघांना जबरदस्तीने कारमधून नेवून टिटवाळा परिसरातील रायता येथील निर्जन स्थळी जंगलात सोडले.


५ लाखाच्या ट्रकसह ५ लाखाची अंडीही त्या ४ अनोळखी इसमांनी चोरून नेली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...