अंबाबाईची सुवर्णपालखी 1 मे रोजी देवीच्या चरणी अर्पण

अंबाबाईची सुवर्णपालखी 1 मे रोजी देवीच्या चरणी अर्पण

1 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशातल्या 3 आद्यपीठांचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत.

  • Share this:

संदीप राजगोळकर, 28 एप्रिल : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईची सुवर्णपालखी आता येत्या 1 मे रोजी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे अंबामातेच्या भक्तांसाठी ही एक पर्वणी ठरणार असून मंदिराच्या शिरपेचातही आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता. पालखीसाठी 26 किलो सोन्याची गरज असल्यामुळे देवीच्या भक्तांनाही सोनं दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. गेल्या 2 वर्षांपासून या पालखीचं काम सुरू होतं आणि काही दिवसांपूर्वीच मंदिर परिसरात या पालखीची विधीवत पूजाही करण्यात आली होती.त्यानंतर आता पालखी ट्रस्टनं ही पालखी देवीच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतलाय.

1 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशातल्या 3 आद्यपीठांचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये तामीळनाडूतल्या कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती आणि आंध्रप्रदेशातील मंत्रालयममधल्या राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश सुबुयेंद्रतीर्थ हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदारही उपस्थित असणार आहेत. दरम्यान भक्तांमध्ये ही पालखी कधी अर्पण केली जाणार याची उत्सुकता होती. ती आता संपणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 03:31 PM IST

ताज्या बातम्या