उपाशी मरण्यापेक्षा आत्मदहनाची परवानगी द्या, पैसे थकल्याने शेतकऱ्यांचा संताप

उपाशी मरण्यापेक्षा आत्मदहनाची परवानगी द्या, पैसे थकल्याने शेतकऱ्यांचा संताप

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याला उस देऊन सहा महिने लोटले तरीही अद्याप पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितलीय.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर 1 ऑगस्ट : दुष्काळ आणि नापीकीमुळे कोरडवाहू शेतकरी अडचणीत आहे. तर बक्कल पाणी असल्याने उसाचं पीक घेणारे शेतकरी अडचणीत येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं नगदी पीक म्हणून उसाकडे बघितलं जातं. उसाच्याच पैशावर हजारो शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटते. मात्र आता उस उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे. साखर कारखाण्याने उसाचे पैसे थकविल्याने 50 ते 60 शेतकऱ्यांनी जिल्हाधीकाऱ्यांकडे अर्ज करून आत्मदहनाची परवानगी मागितलीय.

काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, प्रकाश आंबेडकर देणार दणका?

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याला उस देऊन सहा महिने लोटले तरीही अद्याप पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितलीय. लातूरमधील औसा तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केलीय. सोलापूरच्या कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपला ऊस दिला होता.

एफआरपी कायद्यानुसार नुसार आता पर्यंत त्यांचे पैसे मिळणे अपेक्षित होते मात्र वारंवार मागणी केल्यानंतही शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले नाहीत. या शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह शेतीवर असून उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. वेळेवर पैसे न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. याच उद्विग्नतेतून अखेरीस हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय.

0 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना अकरा प्रश्‍न केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आधी या उत्तरे द्यावीत, अन्यथा महाजनादेश यात्रेच्या मार्गावरूनच जनआक्रोश यात्रा काढून याचा जाब विचारण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

1)राज्यातील बिल्डराकडून वसूल केलेल्या 10 हजार कोटींच्या ठेवी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जमा झाल्या. त्यातील तुम्ही किती पैसे तुम्ही खर्च केले? आणि त्यामधून कुणाची कल्याण झाले. अजूनही बांधकाम कामगार किड्या मुंग्यांसाारखे मरत आहेत. त्यासाठी तुमच्या सरकारने काय केले?

भरधाव कार पुलावरून नदीत पडली, प्रवाहात 3 जण वाहून गेले

2) पीक विम्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल मी स्वतः दीड वर्षापुर्वी पुराव्यासहित माहिती आपल्याकडे दिलेले होते. संबधित विमा कंपनी व त्या कंपनीस सहकार्य करणार्‍या कृषि व महसूल विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांवर काय कारवाई केली, व असे शेतकर्‍यांचे पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली. आयआरडीए (इश्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेपलपमेंट अ‍ॅथोरटी) कडे किती शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या व त्याचे पुढे काय झाले, याचा मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही आढावा घेतला काय?

3) आपले विश्वासू सहकारी श्री. पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखील महाराष्ट्र कृषि मूल्य आयोगाने उसाचा उत्पादन खर्च मागील वर्षाच्या (सन 2016-17)तुलनेत 32 हजाराने कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिलेला आहे. ते ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सांगणार काय ? तसेच मंत्री मंडळातील आपले सहकारी ना. सुभाष देशमुख, ना. तानाजी सावंत, ना. पंकजाताई मुंडे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकविले असले तरीसुध्दा फारसे मनावर घेऊ नका असे ऊस उत्पादकांना सांगणार आहात का?

मामाच्या मित्रांनीच पाजली बिअर.. नागपुरात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

4) आपले सरकारमधील कर्तृत्वान कृषी खात्याने बोंड अळी पासून कापूस कसा वाचवावा याचा कानमंत्र शेतकर्‍यांना दिलेला नसला तरी बोंड अळी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांनी एसटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास ते पुरवण्यार्‍या कंपन्यांवर कारवाई न करता मोदी सरकारच्या आदेशावरून शेतकर्‍यांनाच तुरूंगात टाकले जाईल, कुणाची गय केली जाणार नाही असा सज्जड दम कापूस उत्पादकांना देणार आहात का?

5) तूर, हरभरा, मगू उडीद कांद्याचे अनुदान ठिबकचे अनुदान इत्यादीसाठी अनुदान मिळाले नाही, तरीही तक्रार करू नका, साल्याओ...! असे सांगणार आहात काय? तसेच कर्जमाफीच्या यादी नाव असले तरीसुध्दा थकीत कर्जापोटी बँकानी कर्जवसुली केली अथवा नवीन कर्ज दिले नाही तरीही शेतकर्‍यांनी तक्रार करू नये, कारण सरकार आता झिरो बजेट शेतीचा पुरस्कार करत असल्याने आता कुणीही तक्रार करू नये, असे सांगणार आहात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या