News18 Lokmat

सोलापूरात अमृता फडणवीस यांच्याविरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी

पतंजलीच्या वस्तूंना बाजार मागणी आहे पण तरीही महिलांच्या हाताला काम का नाही, असा सवाल करत घोषणाबाजी महिला मेळाव्यादरम्यान करण्यात आली.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2018 09:03 AM IST

सोलापूरात अमृता फडणवीस यांच्याविरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी

19 मुंबई : सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पतंजलीच्या वस्तूंना बाजार मागणी आहे पण तरीही महिलांच्या हाताला काम का नाही, असा सवाल करत घोषणाबाजी महिला मेळाव्यादरम्यान करण्यात आली.

या मेळाव्या दरम्यान, योग गुरू रामदेव बाब, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि ज्येष्ठ अभनेत्री आणि खासदार हेमा मालिनी अशा दिग्गज मंडळींची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या भाषणावेळी, 'पतंजलीचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत. त्याला बाजारात खूप मागणी आहे. पतंजलीच्या वस्तूंवर कोणीही डोळे जाकून विश्वास ठेऊ शकतो' असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांच्या या भाषणामुळे महिलांनी त्यांच्यावर जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मदतीने ही घोषणाबाजी थांबवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 09:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...