Elec-widget

माझ्यापुढे सर्वांच्या काॅलर खाली येतात,शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

माझ्यापुढे सर्वांच्या काॅलर खाली येतात,शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

बाजारात तुरी कोण कुणाला मारी असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोलाही केली.

  • Share this:

सातारा, 09 मे : मी असल्यावर सगळे सरळ  असतात. माझ्या पुढे सर्वांच्या कॉलर खाली येतात. निवडणुका लागल्या की उडविलेली कॉलर "सरळ होते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. विशेष म्हणजे हे सांगताना पवारांनी स्वतः कॉलर उडवत टोला लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत त्यांनी उदयन राजेंपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच विषयांवर खास पवार शैलीत मिश्किल भाष्य केलं. तसंच कर्नाटकात काँग्रेसला वातावरण असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

"भुजबळ निर्दोष सुटले तर मोठा आनंद"

छगन भुजबळ यांना मिळालेल्या जामिनावर मी आनंदी आहे पण ज्या वेळी ते निर्दोष सुटतील यावेळी मोठा आनंद होईल, असंही शरद पवार म्हणाले.

"बाजारात तुरी कोण कुणाला मारी"

Loading...

आमच्या जागा जास्त आल्या तर मी पंतप्रधान होण्यास तयार  आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. यावर पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. "असं आहे की, निवडणुकीतला देशातला ट्रेंड जो आहे तो बदलासाठी अनुकूल आहे. पण किती जागा मिळतील याचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बाजारात तुरी कोण कुणाला मारी असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोलाही केली.

"माझ्यापुढे सर्वांच्या काॅलर खाली येतात"

साताऱ्यात उदयनराजे आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये पेच निर्माण झालाय असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता पवार म्हणाले. "पेच वैगरे काही नाही. हा समज आहे. या पेचावर उतारा काढण्याची वेळच येणार नाही. मी असलो की सगळे सरळ होतात. माझ्या पुढे सर्वांच्या कॉलर खाली येतात असा टोला लगावत पवारांनी स्वतः कॉलर उडवून दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2018 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...