अर्जुन खोतकरांसोबतचं भांडण हे फक्त नाटक होतं, दानवेंचा गौप्यस्फोट

कुठल्याही परिस्थितीत दानवेंविरुद्ध निवडणूक लढविणारच असा निर्धार करणाऱ्या खोतकरांनी रावसाहेब दानवेंचं आज तोंड भरून कौतुक केलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 07:25 PM IST

अर्जुन खोतकरांसोबतचं भांडण हे फक्त नाटक होतं, दानवेंचा गौप्यस्फोट

जालना 8 जून : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आज जालन्यात सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीदरम्यान दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यातल्या वाद राज्यभर गाजला होता नंतर त्याचं मनोमिलन झालं. या वादावर दानवेंनी आज गौप्यस्फोट केला आणि नेमकं काय झालं ते त्यांच्या खास शैलीत सांगितलं.

दानवे म्हणाले, अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीपूर्वीच दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती, नंतर फक्त नाटक सुरू होतं. आपल्याला गेली 35 वर्ष राजकारणात सक्रिय ठेवणारी जनता जनार्दनच आपली देव असल्याचे सांगत दानवे यांनी खोतकर दानवे वादातला हा नवा खुलासा केला. लोकसभा निवडणुकीत दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्या नंतर मोदी सरकार मध्ये त्यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलाय. जालना येथे सर्वच राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत नागरिकांच्या वतीने दानवे यांचा गौरव करण्यात आला.

खोतकरांनी केलं दानवेंचं तोंडभरून कौतुक

अर्जुन खोतकर म्हणाले, रावसाहेब दानवेंच्या हातात जादू आहे. ते सतत दैदीप्यमान यश मिळवतात. अमित शहा यांना भेटून विनंती करणार की विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्यंत दानवेना प्रदेशाध्यक्षपदी राहू द्यावे.

काय होता वाद?

Loading...

विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी मदत केली नाही, त्रास दिला असा खोतकरांचा आरोप होता. कुठल्याही परिस्थितीत दानवेंविरुद्ध निवडणूक लढविणारच असा निर्धार त्यांनी केला होता. नंतर युती झाल्याने भांडण मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. गरज पडली तर पक्षही सोडण्याचे संकेत खोतकर यांनी दिले होते. मात्र सगळ्यांनीच त्यांच्यातले गैरसम दूर केल्याने अखेर दोनही नेत्यांचं मनोमिलन झालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...